KBC 15 Latest Update: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'केबीसी १५'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून, कौन बनेगा करोडपतीचा खेळ खेळणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी धमाल करताना दिसतात. आता या मंचावर बॅचचे कंपनी देखील हजेरी लावताना दिसत आहे. सध्या या क्वीझ शोचं १५वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या 'केबीसी १५'च्या भागात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न विचारला.
'कौन बनेगा करोडपती' या क्वीझ शोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकाला वेगवेगळ्या विभागांतील प्रश्न विचारत असतात. या खेळात जगभरातील वेगवगेळ्या विषयांवरील प्रश्न सामील केले जातात. या खेळात चित्रपटाविषयीचे प्रश्न देखील विचारले जातात. 'कौन बनेगा करोडपती'च्या खेळात खेळाची सुरुवात करताना अनेकदा बिग बी चित्रपटांशी संबंधित प्रश्न विचारतात. यावेळी त्यांनी शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारला होता. 'जवान' संबंधित हा प्रश्न २००० रुपयांसाठी विचारण्यात आला होता. स्पर्धकानेही अवघ्या ४५ सेकंदात या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
अमिताभ बच्चन यांनी असा प्रश्न विचारला की, 'जवान' चित्रपटातील शाहरुख खानचे पात्र विक्रम राठोड आणि आझाद यांच्यात काय नाते आहे?
उत्तराचे पर्याय: A) भाऊ
B) आजोबा-नातू
C) वडील-मुलगा
D) काका-पुतण्या
अचूक उत्तर: C) वडील-मुलगा
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. 'जवान' हा चित्रपट या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नाही तर, या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले होते.