KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..

KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..

Published Aug 12, 2023 06:17 PM IST

KBC 15 Amitabh Bachchan Fees: टीव्हीवर लोकप्रिय ठरलेला 'कौन बनेगा करोडपती' हा शो केवळ करोडपती बनण्याची संधी देत नाही तर, अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी देखील मिळवून देतो.

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan

KBC 15 Amitabh Bachchan Fees: 'कौन बनेगा करोडपती' हा शो गेल्या १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. आता या शोचा १५वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीव्हीवर लोकप्रिय ठरलेला हा शो केवळ करोडपती बनण्याची संधी देत नाही तर, अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी देखील मिळवून देतो. लोकांना या शोमधील अमिताभ बच्चन यांची प्रत्येक शैली खूप आवडते. गेल्या १४ वर्षात या शोची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या शोसंबंधित सगळ्याच गोष्टी खूप चर्चेत असतात. पण, अमिताभ बच्चन हा शो होस्ट करण्यासाठी किती फी घेतात हे तुम्हाला माहिती आहे का?

'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोच्या लोकप्रियतेमागे अमिताभ बच्चन हे नावच मोठा फॅक्टर आहे. हा शो मधल्या काळात इतर अनेक कलाकारांनी होस्ट केला. पण, या शोला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर वर्षानुवर्षे अमिताभ बच्चन यांनीच या शोची धुरा सांभाळली. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे २५ लाख रुपये आकारले होते.

Sara Kahi Tichyasathi: तळकोकणातील उमा तर, लंडनची संध्या! दोन बहिणींच्या कथेबद्दल शर्मिष्ठा म्हणते...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला सीझन हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांची फी वाढवून एक कोटी रुपये केली. यानंतर सहाव्या आणि सातव्या सीझनसाठी सुमारे दीड कोटी रुपये आकारण्यात आले. त्यानंतर अशाही बातम्या समोर आल्या की, ८व्या सीझनमध्ये ही फी वाढवून २ कोटी करण्यात आली. यानंतर ९व्या सीझनमध्ये २.६ कोटी, १०व्या सीझनमध्ये ३ कोटी आणि नंतर ११ ते १३व्या सीझनमध्ये ३.५ कोटी इतके मानधन त्यांनी आकारल्याचे बोलले जाते.

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती सीझन १५' मधून पुन्हा टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. या सीझनसाठी बिग बी किती फी घेत आहेत याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अमिताभ बच्चन यांनी या सीझनसाठी देखील फी वाढवली असण्याची शक्यता आहे. या शोचा हा १५वा सीझन येत्या १४ ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे. या सीझनचे प्रोमोही समोर आले आहेत. टीझर प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. ‘कौन बनेगा करोडपती सीझन १५’ हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

Whats_app_banner