KBC 14: ४० हजार रुपयांच्या प्रश्नासाठी स्पर्धकाने वापरल्या ३ लाइफलाइन, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 14: ४० हजार रुपयांच्या प्रश्नासाठी स्पर्धकाने वापरल्या ३ लाइफलाइन, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

KBC 14: ४० हजार रुपयांच्या प्रश्नासाठी स्पर्धकाने वापरल्या ३ लाइफलाइन, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 18, 2023 12:43 PM IST

Amitabh Bachchan: स्पर्धकाने एकाच प्रश्नाला तीन लाइफलाइनचा वापर केल्यामुळे पुढे त्याला जास्त खेळता आले नाही.

KBC 14
KBC 14

बॉलिवूडचे ‘बिग बी’ अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन होस्ट करता असलेला ‘कौन बनेगा करोडपती १५’ हा शो टीव्ही विश्वात चांगलाच गाजत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हे बुद्धीमत्तेच्या जोरावर पैसे जिंकताना दिसतात. नुकताच पार पडलेल्या भागात स्पर्धकाने ४० हजार रुपये जिंकण्यासाठी जवळपास ३ लाइफलाइनचा वापर केला आहे. चला पाहूया हा प्रश्न काय होता.

कौन बनेगा करोडपती १४च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात गुजरातमधील आयटी प्रोजेक्ट मॅनेजर सिद्धार्थ खोवल सहभागी झाले होते. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर चांगला खेळ खेळला. शेवटी सगळ्या लाइफलाइन संपल्यामुळे १ लाख ६० हजार रुपयांच्या प्रश्नाला सिद्धार्थ यांनी हा खेळ सोडला.
वाचा: अल्लू अर्जुनला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, लूक पाहून चाहते फिदा

काय होता ४० हजार रुपयांसाठीचा प्रश्न?

भद्र वेदी नावाच्या ५४ फूट उंच इमारतीवर खालीलपैकी कोणती मूर्ती आहे ज्या इमारतीत एक ग्रंथालय आणि थिएटरचा समावेश आहे? असा प्रश्न ४० हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता. त्यासाठी A. स्टॅच्यू ऑफ युनिटी, B. स्टॅच्यू ऑफ बिलिफ, C. स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी आणि D. पंचमुखी हनुमान पुतळा असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य माहिती नसल्यामुळे सिद्धार्थ यांनी तीन लाइफलाइनचा वापर केला. शेवटी A. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे योग्य उत्तर दिले आहे.

त्यानंतर १ लाख ६० हजार रुपयांना सिद्धार्थ यांनी खेळ सोडला. पण त्यांना कोणता प्रश्न विचारण्यात आला चला जाणून घेऊया..

IPL 2023 पूर्वी यापैकी कोणता ऑस्ट्रेलियन खेळाडू अनिल कुंबळे पंजाबी किंग्जचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आला? असा प्रश्न विचारला. त्यासाठी A. टाइम निल्सन, B. ट्रेवर बेलिस, C. टॉम मूडी, D. जस्टिन लँगर असे पर्याय देण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे सिद्धार्थने खेळ सोडला. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. ट्रेवर बेलिस असे आहे.

Whats_app_banner