Kaun Banega Crorepati 16 : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती १६'मध्ये दर आठवड्याला काही पाहुणे येतात. त्यांच्यासोबत बोलताना बिग बी अनेक मनोरंजक खुलासे करतात. गेल्या आठवड्यात आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानसोबत शोमध्ये पोहोचला होता, तर आता शोमध्ये आपल्या वाढवण्यासाठी बॉलिवूड कलाकार कार्तिक आर्यन आणि विद्या बालन पोहोचले होते. त्यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांची आवडती अभिनेत्री कोण आहे, हे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील इच्छा देखील सांगितली. कार्तिक आर्यन आणि विद्या बालन त्यांच्या आगामी 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते, ज्याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शो दरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेकदा संवाद साधले. यादरम्यान कार्तिकने सांगितले की, ‘विद्या बालन त्याला नेहमी सांगते की, तिला ६० आणि ७०च्या दशकातील अभिनेत्री खूप आवडतात.’ यावर विद्या अमिताभ बच्चन यांना म्हणते की, 'मला त्या दशकातील अभिनेत्री खूप आवडतात. त्यांच्यात एक वेगळे सौंदर्य आणि अभिनय क्षमता होती. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या पात्रांमधून उलगडत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्यांनी तुमच्यासोबत काम केले आहे. भविष्यात मलाही तुमच्यासोबत काम करायचे आहे.
विद्या बालनला ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यांची आवडती अभिनेत्री वहिदा रहमान आहे. याचा संदर्भ देत मेगास्टारनी एक किस्साही शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, 'प्यासा' चित्रपटातील एका गाण्याच्या शॉटने त्यांची प्रतिभा समोर आली आहे. याशिवाय ‘बिग बीं’नी वहिदा रहमानचा क्लोजअप देखील लक्षात ठेवला आणि सांगितले की, त्या सीनने त्यांच्यावर खूप प्रभाव टाकला होता.
अमिताभ बच्चन म्हणाले की, 'किती सुंदर शॉट होता तो, त्यावेळी क्लोज-अप पूर्ण करायला फक्त २ किंवा ३ लागतात. त्या काळात सर्व काही झटपट झाले. हे आता होत नाही. यानंतर अमिताभ बच्चन यांनी १९६२ मध्ये आलेल्या 'साहिब बीबी और गुलाम' या कल्ट फिल्मबद्दलही सांगितले.’
कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्याशी झालेल्या संभाषणात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मनातील इच्छांबद्दलही सांगितले, ज्या अधुऱ्या राहिल्या आहेत. ते म्हणाले की, 'मीना कुमारीजींसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही आणि मला याचे पश्चाताप होईल. ‘साहिब बीवी और गुलाम’ चित्रपटातील 'ना जाओ सैयां' त्यांचे हे गाणे मी पाहत राहिलो. यानंतर विद्या बालननेही बिग बींसोबत डान्स केला, ज्याचा प्रोमो व्हायरल होत आहे.’
संबंधित बातम्या