KBC 16: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रियॅलिटी शोचे १५ सीझन आजवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले आहेत. आता आजपासून या शोचा १६वा सीझन छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. केबीसीच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात फक्त एकाच स्पर्धकाला ७ कोटी रुपये जिंकता आले आहेत. इतक्या वर्षांत केवळ एकच स्पर्धक ही किमया साध्य करून दाखवू शकला आहे. दिल्लीच्या अचिन नरुलाने आपल्या भावासोबत मिळून हा विक्रम रचला होता. भाऊ सार्थकसोबत हॉट सीटवर बसणाऱ्या अचिनला वाटलं होतं की, तो काही लाख जिंकून शोमधून निघून बाहेर पडेल. पण एक-एक करून तो प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देत राहिला.
‘कौन बनेगा करोडपती’मधून ७ कोटी जिंकल्यानंतर अचिनने काय काय केले ते सांगितले. अचिनने म्हणाला की, त्याने या पैशांतून पहिला ‘आयफोन ६’ खरेदी केला आणि तो अजूनही त्याच्यासोबत आहे. सार्थकने सांगितले की, त्याने परदेश दौऱ्याचा बेत आखला आणि खूप मजा केली. स्वत: ‘कौन बनेगा करोडपती’ची दुनिया अनुभवल्यानंतर दोन्ही भावांनी सांगितले की, हा शो स्क्रिप्टेड नाही. अचिन म्हणाला, 'हा शो स्क्रिप्टेड नाही. मात्र, अलीकडच्या सीझनमध्ये यातला ड्रामा काहीसा वाढला आहे. विशेषत: दुसऱ्या चॅनेलवर शिफ्ट झाल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत, कारण आता ते स्पर्धकांच्या कथेवर जास्त लक्ष केंद्रित करतात.'
सार्थक पुढे म्हणाला की, या खेळामध्ये स्क्रिप्टिंगचा कधीच सहभाग नसतो. हा शेवटच्या ५ मिनिटांत स्पर्धक काही प्रतिक्रिया नक्की नोंदवतात, पण बाकी गोष्टी नॉर्मल असतात. हा संपूर्ण खेळ एकदम खरा आहे. सार्थक म्हणाला की, ‘केबीसी जिंकणे हा माझ्या आयुष्यातील एक खास क्षण होता. त्यावेळी तो सरकारी नोकरीची तयारी करत असल्याने त्याच्या अभ्यासाचा या शोमध्ये खूप फायदा झाला. असे क्षण तुम्ही तुमच्या आठवणीतून कधीच पुसून टाकू शकत नाही’. २५ लाख जिंकून परत येईन असे वाटले होते, असे सार्थक म्हणाला.
या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेबद्दल सार्थक म्हणाला, ‘योग्य वेळी प्रश्नांची उत्तरे देताना त्या वेळेचा आनंद घेण्याची संधीही मिळते. पहिल्या २-३ प्रश्नांनंतर तुम्हाला काहीसा आराम आणि दिलासा मिळू लागतो. पण, लाईफलाईनचा योग्य वापर करणे ही एक खास युक्ती आहे. आपल्याकडून चुका होऊ नयेत, म्हणून आपले मन शांत ठेवावे लागेल. अमिताभ सर अतिशय दयाळू व्यक्ती आहेत आणि ते शो दरम्यान आपल्याला खूप रिलॅक्स वाटतात.’