KBC 16: देवीयों और सज्जनो… ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर परतले महानायक अमिताभ बच्चन! शेअर केला फोटो
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: देवीयों और सज्जनो… ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर परतले महानायक अमिताभ बच्चन! शेअर केला फोटो

KBC 16: देवीयों और सज्जनो… ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर परतले महानायक अमिताभ बच्चन! शेअर केला फोटो

Jul 26, 2024 09:56 AM IST

KBC 16: अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे हे फोटो पाहून चाहत्यांचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

KBC 16 Latest Update: कौन बनेगा करोडपती’ हा क्विझ शो हा टीव्ही विश्वातील सर्वात आवडता शो ठरला आहे. लोकांना हा शो जितका आवडतो तितकीच या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनाही प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळालेली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा पुढचा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी'च्या  १६व्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अमिताभ यांनी शोच्या सेटवरील फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आज, २५ एप्रिल रोजी आपल्या एक्स हँडलवरून शोच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी पहिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन लिहिलं- ‘केबीसी १६ सीझनमध्ये परत...’

पाहा अमिताभ बच्चन यांची पोस्ट!

तर, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत ते सेटच्या कॉरिडॉरमध्ये धावताना दिसत आहेत. या फोटोसोबत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘हो परत आणि तरीही रुटीनमध्ये कोणताही बदल झालेला नाही... शर्यत अजूनही सुरू आहे...’

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले फोटो पाहून चाहते उत्सुक आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘काय खाता सर? तुमचा फिटनेस इतका चांगला आहे.’  तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्ही आगच लावली आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं की, ‘परतणार होतात तर मग गेल्या वर्षी तुम्ही इतके भावूक का झालात?’

अमिताभ बच्चन झालेले भावूक!

गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ‘या सीझनमध्ये मी या स्टेजवरून शेवटचं गुडनाईट, शुभ रात्री, अलविदा म्हणणार आहे...’ हे बोलताना अमिताभ बच्चन भावूक झाले होते. अमिताभ यांच्या या बोलण्यावरून चाहत्यांना अंदाज आला होता की, कदाचित अमिताभ यापुढे केबीसी होस्ट करणार नाहीत. मात्र, अमिताभ आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी हा शो होस्ट करणार आहेत.

कधी सुरू होतोय शो?

शोच्या निर्मात्यांनी नुकताच एक नवीन प्रोमो जारी करून प्रीमियरचा सस्पेन्स दूर केला होता. 'कौन बनेगा करोडपती सीझन १६' येत्या १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे, प्रेक्षक हा लोकप्रिय शो सोनी टीव्ही किंवा सोनी लिव्ह ॲपवर पाहू शकतील. ‘केबीसी सीझन १६’ची टॅगलाईन आहे, 'जीवन आहे, प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल, उत्तर द्यावे लागेल!' हा कार्यक्रम रात्री ९ वाजता टीव्हीवर प्रसारित होईल.

Whats_app_banner