Kaun Banega Crorepati 16 Latest Update : 'कौन बनेगा करोडपती १६' हा शो सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या शोमध्ये येणाऱ्या लोकांचे नशीब क्षणार्धात बदलते. कालच्या शोमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. बंगालमधून आलेल्या सौरभने त्याच्या ज्ञानाच्या जोरावर २५ लाख रुपये जिंकले. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले आणि त्याची मोठी संधी हुकली. सौरभ हा अतिशय गरीबीचं जीवन जगत होता. तो एका चाळीतील छोट्याशा घरात राहतो. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने २५ लाख रुपये जिंकले. मात्र, क्रिकेटशी संबंधित एका प्रश्नावर तो अडकला आणि यामुळे त्याची ५० लाख रुपये जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली.
बंगालचा सौरभ चौधरी काल 'केबीसी १६'मध्ये आला होता. त्याने आपल्या तल्लख ज्ञानाचे प्रदर्शन केले आणि २५ लाख रुपये जिंकले. सौरभने कोणत्या प्रश्नाचे उत्तर देऊन २५ लाख जिंकले ते बघा...
A. श्री सी सुब्रमण्यम
B. श्री रफी अहमद किडवाई
C. श्री केएम मुन्शी
D. श्री सुरजित सिंग बर्नाला
योग्य उत्तर पर्याय A. श्री सी सुब्रमण्यम आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सौरभला त्याच्या मित्राने त्याला मदत केली. खरंतर, त्याच्याकडे याचं उत्तर नव्हतं म्हणून त्याने व्हिडिओ कॉलची मदत घेतली आणि तो लखपती झाला. सौरभने २५ लाख जिंकताच सेटवर बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले.
सौरभने २५ लाख आपल्या बुद्धीच्या जोरावर जिंकले, पण ५० लाखांचा प्रश्न तो चुकला. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे सौरभला ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहित होते, परंतु विश्वासाच्या अभावामुळे तो ते देऊ शकला नाही. काय होता हा प्रश्न? तुम्हाला माहीत आहे का उत्तर?
A. मन्सूर अली खान पतौडी
B. दलीप सिंह
C. इफ्तिकार अली खान पतौडी
D. रणजित सिंह
सौरभला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित होते, पण त्याच्या उत्तरावर त्याचा विश्वास नव्हता. अशा स्थितीत त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण खेळ सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना उत्तर देण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी बी दलीप सिंह जी असे उत्तर दिले, जे अगदी बरोबर होते. यामुळे सौरभला थोडं वाईट वाटलं, तरी २५ लाख जिंकल्याचा आनंदही झाला.
संबंधित बातम्या