Kaun Banega Crorepati 16 first crorepati: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती १६' मुळे चर्चेत आहेत. बिग बींचा हा शो प्रेक्षकांचं सतत मनोरंजन करत असतो. या शोमधील स्पर्धक केवळ करोडपती बनण्याच्या इच्छेने येत नाहीत, तर असे अनेक जण आहेत ज्यांच्यासाठी बिग बींना भेटणे हे शो जिंकण्यापेक्षा जास्त आहे. आता या सिझनला पहिला करोडपती मिळाला आहे. पण ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. चला जाणून घेऊया काय होता ७ कोटी रुपयांचा प्रश्न...
'कौन बनेगा करोडपती १६' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो १२ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. नुकताच या शोला त्यांचा पहिला करोडपती मिळाला आहे. जम्मू-काश्मीरचे रहिवासी चंद्र प्रकाश यांच्या डोक्यावर यंदाच्या मोसमातील पहिल्या कोट्यधीशाचा मुकुट सजवण्यात आला आहे. चंद्रप्रकाश यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी इतिहास रचला. चंद्रप्रकाश यांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि १ कोटी रुपये जिंकले. केवळ प्रेक्षकच नव्हे तर बिग बीदेखील त्यांच्या खेळाने खूप प्रभावित झाले होते. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता होता एक कोटी रुपयांचा प्रश्न, ज्याचे उत्तर देत २२ वर्षीय चंद्र प्रकाश करोडपती बनले?
प्रश्न : कोणत्या देशाचे सर्वात मोठे शहर त्याची राजधानी नसून बंदर आहे, ज्याचे अरबी नाव शांततेचे निवासस्थान आहे?
अ) सोमालिया
ब) ओमान
क) टांझानिया
ड) ब्रुनेइ
या प्रश्नाचे योग्य उत्तर क) टांझानिया आहे.
यानंतर बिग बींनी चंद्र प्रकाश यांना सात कोटींचा प्रश्न विचारला. चंद्र यांना या जॅकपॉट प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते आणि त्याने आधीच आपली सर्व लाईफलाईन वापरली होती. त्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊया काय होता तो सात कोटी रुपयांचा प्रश्न?
वाचा: बाईsssss तुझा माझ्यावर विश्वास नाही का?; अभिजीतने केली निक्कीची नक्कल
प्रश्न : १५८७ मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रज आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेले पहिले नोंदणी केलेले अपत्य कोण होते?
अ) व्हर्जिनिया डेअर
ब) व्हर्जिनिया हॉल
क) व्हर्जिनिया कॉफी
ड) व्हर्जिनिया सिंक
या प्रश्नाचे योग्य उत्तर अ) व्हर्जिनिया डेअर असे आहे.