KBC 16 : मुलीच्या भविष्यासाठी खेळणाऱ्या रश्मीला एका प्रश्नानं थांबवलं; ६.४० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16 : मुलीच्या भविष्यासाठी खेळणाऱ्या रश्मीला एका प्रश्नानं थांबवलं; ६.४० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?

KBC 16 : मुलीच्या भविष्यासाठी खेळणाऱ्या रश्मीला एका प्रश्नानं थांबवलं; ६.४० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?

Oct 25, 2024 11:29 AM IST

Kaun Banega Crorepati 16 latest Update: या खेळात पवित्र नद्यांशी संबंधित एका प्रश्नावर रश्मी अडकली होती. तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती आहे का?

KBC 16
KBC 16

Kaun Banega Crorepati 16 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट शो 'कौन बनेगा करोडपती सीझन १६' सध्या चर्चेत आहे. हा एक असा शो आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाहायला आवडतो. कालच्या एपिसोडमध्ये रश्मी कुमारी नावाची स्पर्धक आली होती, जिने आपल्या ज्ञानाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या शोच्या सेटवर रश्मीने आपल्या आयुष्याची वेदनादायी कहाणी देखील सांगितली. आपल्या मुलीसाठी रश्मी हा खेळ खेळत होती. मात्र, एका प्रश्नावर ती अडकली. केवळ ३ लाख ४० हजार रुपये जिंकूनच रश्मी घरी परतली.

या खेळात पवित्र नद्यांशी संबंधित एका प्रश्नावर रश्मी अडकली होती. तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती आहे का? या खेळाच्या ११व्या प्रश्नावर रश्मी यांनी खेळ सोडला. हा प्रश्न इतका अवघड होता की, ज्यात रश्मीला जनताही साथ देऊ शकली नाही.

काय होता प्रश्न?

हॉटसीटवर विराजमान झालेल्या रश्मी कुमारीने चांगला खेळ दाखवला. पण, तिला फार पुढे जाता आले नाही आणि तिचा खेळ ११व्या प्रश्नावरच अडकला. या प्रश्नासाठी रश्मीने ‘प्रेक्षकांचा कौल’ या लाईफलाईनचीही मदत घेतली. मात्र, जनता जनार्दनही त्यांना मदत करू शकली नाही. काय होता हा प्रश्न जाणून घेऊया...

KBC 16 : हर्षा जिंकू शकल्या नाहीत २५ लाख रुपये; तुम्हाला माहितीय का हिंदुत्वाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर?

प्रश्न : चीनमध्ये कोणत्या नदीला 'लँगकेन झांगबो' म्हणतात?

पर्याय:

ए. रवी

बी. सतलज

सी. चिनाब

डी. व्यास

काय आहे याचे योग्य उत्तर?

मात्र, या प्रश्नाचे उत्तर रश्मी यांना देता आले नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिने लोकांची मदतही घेतली. पण तरीही तिला योग्य उत्तर देता आले नाही. खरं तर, हा प्रश्नच खूप कठीण होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 'बी' अर्थात सतलज. ही नदी हत्तीच्या सोंडेच्या आकारात आहे, म्हणून तिला 'लांगकेन झांगबो' असे नाव देण्यात आले आहे.

रश्मी मुलीसाठी खेळत होती खेळ!

कौन बनेगा करोडपती १६’मध्ये रश्मी कुमारी नावाची स्पर्धक हॉट सीटवर बसली होती. रश्मीची मुलगी १५ वर्षांची आहे. पण, तिला एक अशी समस्या आहे, की तिची वाढ अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलासारखी आहे. रश्मी या हॉटसीटवर विराजमान होतानाच म्हणाली होती की, ती केबीसीमधून जितकी रक्कम जिंकेल, ती तिच्या मुलीच्या भविष्यासाठी जपून ठेवेल.

Whats_app_banner