Kaun Banega Crorepati 16: अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा १६वा सीझन चर्चेत आहे. बिग बी सर्व स्पर्धकांना खेळाचे नियम समजावून सांगत खेळ पुढे नेत आहेत. अलीकडेच शोच्या चौथ्या भागात यूपीच्या सुधीर कुमार वर्मा यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. हॉटसीटवर बसल्यावर अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाचे स्वागत केले. यानंतर त्यांनी गेमशी संबंधित प्रत्येक तपशील त्यांच्यासोबत शेअर केला. या खेळाची सुरुवात सुपर बॉक्स फेरीने झाली होती. या खेळामध्ये स्पर्धकाने ५०,००० रुपयांची रक्कम जिंकली. यानंतर सुधीरने प्रेक्षकांचा कौल घेणारी लाईफलाइन वापरली. या खेळात पहिला प्रश्न संगीत क्षेत्राशी निगडीत होता.
प्रश्न: कोणत्या संगीतकाराच्या वडिलोपार्जित घराचे 'सरोद घर' नावाच्या संगीत वारशाच्या संग्रहालयात रूपांतर करण्यात आले?
ए) पंडित हरिप्रसाद चौरसिया
बी) उस्ताद अमजद अली खान
सी) उस्ताद अल्लाह राखा कुरेशी
डी) पंडित रविशंकर
बराच विचार केल्यानंतर, सुधीर कुमार यांनी पर्याय बी निवडून बरोबर उत्तर दिले. यासाठी त्याने ६,४०,००० रुपये जिंकले. या खेळामध्ये १२,५०,००० रुपये जिंकल्यानंतर बिग बींनी त्याचे कौतुक केले आणि म्हणाले, 'तुम्ही जिथून शिक्षण घेतले, त्या ठिकाणाला आम्हीही सलाम करतो. हे प्रश्न खूपच कठीण होते.’ यानंतर अमिताभ बच्चन यांनी सुधीर कुमार याच्या वडिलांचे अभिनंदन केले आणि त्यांची सर्व स्वप्ने आता पूर्ण होतील, असे सांगितले.
यानंतर सुधीर कुमार यांनी २५ लाख रुपयांमध्ये ऑडियन्स पोल लाईफलाईन वापरली. यासाठी प्रश्न होता...
प्रश्न: एप्रिल २०२४मध्ये देशाच्या माहिती मंत्रालयाने यापैकी कोणत्या देशात हिंदीमध्ये साप्ताहिक रेडिओ प्रसारण सुरू केले?
ए) ओमान
बी) सौदी अरेबिया
सी) युएई
डी) कुवेत
प्रेक्षक मतदानाच्या मदतीने, सुधीर कुमार यांनी डी हा पर्याय निवडून योग्य उत्तर दिले. यानंतर बिग बींनी सुधीर कुमार यांना ५० लाख रुपयांचा प्रश्न विचारला. या प्रश्नासाठी त्यांनी 'व्हिडिओ कॉल अ फ्रेंड' ही लाईफलाईन वापरली.
प्रश्न: हेन्री वॉल्टर्सच्या १८३०च्या जनगणनेचा विषय कोणता होता, जो ब्रिटिश भारतातील शहराच्या पहिल्या पूर्ण जनगणनेपैकी एक होता?
ए) मुंबई
बी) ढाका
सी) म्हैसूर
डी) लाहोर
लाईफलाईन वापरूनही सुधीर कुमारला कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय ए निवडला होता, पण या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय बी म्हणजेच ढाका होते. यानंतर सुधीर कुमार यांनी २५ लाख रुपये आणि ८०,००० रुपये बोनस घेऊन घर गाठले.