Kaun Banega Crorepati 16 Latest Episode: महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती १६' या शोचा कालचा भाग खूपच प्रेक्षणीय होता. फास्टर फिंगरमध्ये, दिल्लीतील एका स्कूल कॅब ड्रायव्हरने अचूक उत्तर देऊन हॉट सीटवर आपली जागा पटकावली होती. पण, तो अवघे १० हजार रुपये जिंकू शकला. याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दिल्लीच्या सतनाम सिंहनंतर पंजाबचा श्रीम शर्मा हॉट सीटवर आला आणि त्याने दमदार खेळ दाखवला. त्याने आपला इथवरचा प्रवास कसा होता हे सांगितले. आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीमने ९६ दिवस काहीच खाल्ले नव्हते. मात्र, चांगला खेळ करत त्याने १२ प्रश्नांची अचूक उत्तरे देत १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. पण, १३व्या प्रश्नाला तो चुकला.
पंजाबमधील श्रीम शर्मा यांनी हॉट सीटवर येईपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, हे सगळ्यांना सांगितले. यादरम्यान त्यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले की, त्यांची आई केबीसीची मोठी चाहती आहे. हॉट सीटवर येण्याचे तिचे स्वप्न होते आणि आज तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. यावेळी श्रीम शर्मा यांची आई खूप भावूक झाली. केबीसीच्या पहिल्या फेरीसाठी आपली निवड झाल्याचा फोन आल्यावर आपण १०८ दिवस उपवास ठेवल्याचेही त्याने सांगितले. श्रीम शर्मा यांनी असेही सांगितले की, या दिवसांत ते आवश्यक तेवढीच फळे खात होतेत. केबीसीच्या सेटवर येईपर्यंत त्यांनी ९६ दिवस अन्नाचा एक दाणाही खाल्ला नाही. श्रीम यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून उपवास सोडण्याची शपथ घेतली, जी त्यांनी रसमलाई खाऊन पूर्ण केली.
श्रीम शर्मा यांनी आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन केले आणि १२ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. मात्र, या काळात त्यांनी सगळ्या लाईफलाईन वापरल्या. श्रीम शर्मा यांनी केवळ १२ लाख ५० हजार रुपये जिंकले आणि आईचे स्वप्न पूर्ण केले. पण ते १३व्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. श्रीम शर्मा यांनी आपले ज्ञान चांगले दाखवून चांगला खेळ केला. मात्र, तेराव्या प्रश्नाचे उत्तर देण्यात ते अपयशी ठरले.
प्रश्न: रवींद्रनाथ टागोर यांच्या शताब्दी समारंभात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे नाव बदलून एका दिवसासाठी टागोर स्क्वेअर असे करण्यात आले?
ए) रेड स्क्वेअर, मॉस्को
बी) टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क
सी) ट्रॅफलगर स्क्वेअर, लंडन
डी) सेंट पीटर स्क्वेअर, व्हॅटिकन
या प्रश्नाचे योग्य उत्तर 'बी' पर्याय म्हणजे टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क हे होते.