Kaun Banega Crorepati 16 : ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेत असतो. लोकांना श्रीमंत बनवणाऱ्या या शोला लोकांची पसंती मिळत आहे. अनेक स्पर्धक पैसे जिंकण्यासाठी या शोमध्ये येतात, तर अनेकांना केबीसी होस्ट अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा असते. आतापर्यंत अनेक स्पर्धकांनी या शोमधून लाखो रुपये जिंकले आहेत.
या कार्यक्रमाच्या नव्या भागाची सुरुवात मध्य प्रदेशातील रहिवासी रचित कुमार यांच्यापासून होते. रोलओव्हर फेरी जिंकून स्पर्धक रचित कुमारने खेळाची सुरुवात केली. रचित हा एमपीमध्ये पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहे. रचितने अतिशय शानदार पद्धतीने खेळाची सुरुवात केली. त्याने लाईफ लाईन ‘सुपर सवाल’ आणि ‘दुगनास्त्र’ या दोन लाईन्स वापसरून ३,२०,००० रुपये जिंकले. पण, तो ६ लाख, ४० हजार रुपयांच्या प्रश्नावर अडकला. हा प्रश्न अभिनेत्री श्रीदेवी हिचे पती बोनी कपूर यांच्याशी संबंधित होता. जाणून घेऊया काय होता हा प्रश्न?
‘केबीसी १६’चा स्पर्धक रचित कुमारने ५० हजार रुपये जिंकल्यानंतरच लाईफलाईन वापरण्यास सुरुवात केली. यानंतर बिग बींनी रचितला ६ लाख ६० हजार रुपयांना विचारलेल्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं. अनिल कपूर यांचे बंधू आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचे पहिले खरे नाव काय आहे? असा हा प्रश्न होता. मात्र, याचे उत्तर रचितला माहित नव्हते, म्हणून त्याने 'ऑडियंस पोल'चा वापर केला. पण, जनताही त्यांना मदत करू शकली नाही. जनतेने सर्वाधिक मताधिक्याचा पर्याय सी-अनिश दिला होता. मात्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर होते बी-अचल कपूर. अशा तऱ्हेने चुकीचं उत्तर दिल्याने रचित केवळ २० हजार रुपये सोबत घेऊन जाऊ शकला.
या शोदरम्यान रचित कुमारने बिग बींसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. त्याने सांगितले की, एकदा त्याचा एक अतिशय धोकादायक अपघात झाला होता, ज्यात त्याच्या गुडघ्याचे हाड तुटले होते आणि अनेक फ्रॅक्चर झाले होते. मात्र, या सगळ्यातून स्वत:ला सावरून त्याने पुन्हा स्वतःला खंबीर केले. या काळात त्याच्या आईने त्याची खूप काळजी घेतली, त्याच्या आईला देखील अर्धांगवायू झाला होता. मात्र, या माऊलीने आपल्या मुलाला सावरायला मदत केली. हे ऐकून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
संबंधित बातम्या