KBC 16: खिशात अवघे २६० रुपये घेऊन मुंबईत आलेला बंटी वाडिवा बनणार ‘केबीसी १६’चा पहिला करोडपती?-kaun banega crorepati 16 contestant came from tribal area banti vadiva reached 1 cr question in game ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: खिशात अवघे २६० रुपये घेऊन मुंबईत आलेला बंटी वाडिवा बनणार ‘केबीसी १६’चा पहिला करोडपती?

KBC 16: खिशात अवघे २६० रुपये घेऊन मुंबईत आलेला बंटी वाडिवा बनणार ‘केबीसी १६’चा पहिला करोडपती?

Sep 05, 2024 01:38 PM IST

Kaun Banega Crorepati 16: केबीसी १६मध्ये सहभागी झालेला आदिवासी भागातून आलेला स्पर्धक बंटी वाडिवा आता १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे.

Kaun Banega Crorepati 16 Banti Vadiva
Kaun Banega Crorepati 16 Banti Vadiva

Kaun Banega Crorepati 16 Banti Vadiva: ‘कौन बनेगा करोडपती १६’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या या शोच्या नव्या एपिसोडमध्ये असे काही घडले आहे, जे आजपर्यंत कधीही घडले नव्हते. या शोमध्ये सहभागी झालेला आदिवासी स्पर्धक, बंटी वाडिवा अनेक अडचणींशी झुंज देत आता हॉट सीटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. या भागाची सुरुवात ‘फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ या सेगमेंटने झाली, ज्यामध्ये बंटी जिंकला आणि त्याने हॉट सीटवर आपले स्थान पटकावले. इतकंच नाही तर, इतक्या कठीण परिस्थितीतून इथवर पोहोचलेल्या बंटीने आता एक कोटीच्या प्रश्नापर्यंत झेप घेतली आहे.

यादरम्यान आनंदी झालेल्या बंटीने खुलासा केला की, केबीसीमध्ये येणे हे त्याचे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. यावेळी बंटीने त्याची इथवरच्या प्रवासाची गोष्टही शेअर केली. बंटीने सांगितले की, त्याचे वडील शेतकरी असून, दर महिन्याला केवळ ११ हजार रुपये कमावतात. या आर्थिक संघर्षानंतरही, त्याच्या पालकांनी त्याचे शिक्षण कुठेच थांबू दिले नाही आणि नेहमी त्याला पाठिंबा दिला.

बंटीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी घेतले कर्ज

बंटी खिशात २६० रुपये घेऊन तो मुंबईत आला होता आणि आता तो करोडपती होण्याच्या पायरीवर पोहोचला आहे. आपल्या वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आणि आपल्या गावातील मुलांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तो आपल्या या विजयाचा उपयोग करण्याचा विचार करत आहे. प्रवास कितीही आव्हानात्मक असला तरीही स्वप्ने सत्यात उतरू शकतात, हे बंटीने सिद्ध करून दाखवले आहे.

KBC 16: ब्रेन ट्युमरशी झुंज देणारी नरेशी मीना १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली! आता अमिताभ बच्चन देणार मदतीचा हात

बंटीची गोष्ट ऐकून अमिताभ बच्चन प्रभावित झाले. त्यांनी बंटीला प्राण्यांबद्दलचा पहिला प्रश्न विचारला, ज्याचे बंटीने बरोबर उत्तर दिले. बंटीने पहिल्या फेरीत अतिशय हुशारीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि १०००० रुपयांचा टप्पा पार केला. यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला, आणि त्याने अचूक उत्तर देत ‘डबल वेपन’ पॉवर देखील मिळवली. यामुळे त्याला १६०००० रुपये जिंकण्याची संधी मिळाली. नंतर बिग बींनी पुढचा प्रश्न विचारला की, ‘कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने द नर्व्हस मेकॅनिझम ऑफ प्लेग्स हे पुस्तक लिहिले आहे?’ यासाठी उत्तराचे पर्याय होते, ए) सत्येंद्र नाथ बोस, बी) जगदीशचंद्र बोस, सी) पी.सी. महालनोबिस आणि डी) पीओफ बिरबल साहनी. बंटीने ‘बी’ पर्याय निवडला आणि बक्षिसाची रक्कम जिंकली.

२६० रुपये घेऊन आलेला बंटी करोडपती होऊ शकेल का?

बंटीने यश मिळवत आत्मविश्वासाने आपला पुढचा खेळ सुरू ठेवला आणि शेवटी त्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन २५ लाख रुपये जिंकले. बजर वाजताच, एपिसोड संपल्याचा संकेत देत, अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली की, बंटी पुढील एपिसोडमध्ये आपला खेळ सुरू ठेवेल. मात्र, त्यानंतर रिलीज झालेल्या प्रोमोने प्रेक्षकांना सर्वाधिक आश्चर्यचकित केले. यात बंटीने १५व्या प्रश्नाचे म्हणजे १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न करताना तो म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम पत्करणार आहे.' आता अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेला बंटी एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकेल का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.