KBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

KBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 29, 2024 07:38 AM IST

KBC 16: कौन बनेगा करोडपती होस्ट करताना अमिताभ अनेकदा अविस्मरणीय किस्से सांगताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतच किस्सा सांगितला.

Ratan Tata and Amitabh Bachchan
Ratan Tata and Amitabh Bachchan

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय क्विज शो म्हणून 'कौन बनेगा करोडपती' पाहिला जातो. या शोच्या १६व्या सिझनचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन करताना दिसत आहेत. नुकताच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी दिवंगत दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे कौतुक केले. एकदा रतन टाटा यांनी पैसे उधार मागितले असल्याचे सांगितले. ते ऐकून हॉट सीटवर बसलेले स्पर्धक देखील आश्चर्यचकीत झाले.

प्रवासादरम्यान झाली होती रतन टाटांची भेट

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कौन बनेगा करोडपती १६चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेले असून पाहुणे स्पर्धक बोमन इराणी आणि फराह खान यांच्यासमोर रतन टाटा यांच्याशी संबंधित गोष्ट सांगताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी खेळादरम्यानच एकदा प्रवासदरम्यान रतन टाटा भेटले असतानाचा किस्सा सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

एकदा अमिताभ बच्चन आणि रतन टाटा हे एकत्र प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी बिंग बींकडे पैसे उधार मागितले होते. अमिताभ बच्चन यांनी त्या घटनेची आठवण सांगताना सांगितले की, "तो माणूस कोण होता हे मी सांगू शकत नाही. इतका साधा माणूस. एकदा झालं असं की आम्ही दोघं एकाच जहाजातून लंडनला जात होतो. शेवटी आम्ही हिथ्रो विमानतळावर उतरलो. आता त्याला घ्यायला आलेले लोक गेले असतील आणि त्याला दिसले नसतील. त्यामुळे तो फोन करण्यासाठी एका फोन बूथवर गेला. मीपण बाहेर उभा होतो. थोड्या वेळाने तो आला आणि माझा विश्वासच बसत नाही की तो मला म्हणाला, 'अमिताभ, मी तुमच्याकडून काही पैसे उधार घेऊ शकतो का?' माझ्याकडे फोन करायला पैसे नाहीत."

भारताने गमावला हिरा

रतन टाटा यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. मिठा पासून ते सॉफ्टवेअर बनवण्यापर्यंत टाटा यांनी अनेक कंपन्या उघडल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक मोठे यश संपादन केले. रतन टाटा यांचे रात्री साडेअकरा वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. सलमान खानपासून अजय देवगणपर्यंत आणि प्रियांका चोप्रापासून अनुष्का शर्मापर्यंत सर्वांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या शोमध्ये अमिताभ यांनी देशाने इंडस्ट्रीतील सर्वात मौल्यवान रत्न कसे गमावले याची आठवण करून दिली.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू

बिग बींच्या सूत्रसंचालनाबद्दल

कौन बनेगा करोडपती दिवसेंदिवस अधिकच उत्सुक होत आहे. या रिअॅलिटी टीव्ही शोला या सीझनमध्ये कोट्यधीशही मिळाले आहेत आणि अमिताभ बच्चन यांनी शो होस्ट करताना पुन्हा एकदा आपला वाढदिवस साजरा केला. बिग बी गेल्या अनेक दशकांपासून या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत आणि आता ते या शोची ओळख बनले आहेत.

Whats_app_banner