अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन जेव्हा 'कौन बनेगा करोडपती'मध्ये एकत्र असतात तेव्हा खूप मजा येते. लोकप्रिय रिअॅलिटी शो केबीसी १६ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळाली. अभिषेक बच्चन आपल्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. बाप-लेकाच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. दरम्यान, शूजित सरकार यांनी या दोघांपैकी कोण गाडी व्यवस्थित चालवते असा प्रश्न विचारला असता अमिताभ बच्चन यांनी विलंब न लावता हात वर केला.
"अमिताभ-अभिषेकमध्ये कोण चांगला ड्रायव्हर आहे" असा प्रश्न शूजित सरकारने केबीसीमध्ये विचारला. तेव्हा अमिताभ यांनी लगेच हात वर केला. अभिषेक बच्चनने वडिलांना अडवले आणि म्हणाला पा प्लिज. तेथे उपस्थित असलेले सर्वांना हसू अनावर झाले. अभिषेक बच्चनने सांगितले की, त्याच्या वडिलांची सवयदेखील बहुतेक वडिलांसारखीच आहे. ज्युनिअर बच्चन म्हणाला, 'पा प्लिज.. हे गाडी कमी चालवतात आणि इतरांना जास्त टोकतात. जर कोणी चुकीच्या मार्गाने आले तर त्यांचा फोटो काढून ठेवा वाहतूक पोलिसांना पाठवतात. समोरची व्यक्ती समजते अरे अमिताभ बच्चन माझा फोटो काढत आहेत.' हा किस्सा ऐकून सर्वांना हसू अनावर झाले. अभिषेक बच्चन जेव्हा हे सगळं सांगत होते तेव्हा अमिताभ मोठ्या निरागसतेने हे सर्व ऐकत होते.
अमिताभ बच्चन आणि शूजित सरकार यांना अभिषेकचे बोलणे ऐकून हसू अनावर होते. तसेच कार्यक्रमात हजर झालेल्या सर्वांना हसू अनावर झाले आहे. सध्या सोशल मीडियावर केबीसीमधील हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान
अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट २२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका अशा माणसाची आहे ज्याच्या आयुष्यात अवघे काही दिवस शिल्लक आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे खूप कौतुक होत आहे.