छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून कौन बनेगा करोडपती खेळला जातो. या शोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना बु्द्धीमत्तेच्या जोरावर कोट्यवधी रुपये जिंकता येतात. सध्या केबीसीचे १५वे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचान करत असलेल्या या शोमध्ये नुकताच आठ वर्षांचा मुलगा हॉट सीटवर बसला होता. त्याने बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही.
इयत्ता तिसरीमध्ये शिकत असणारा विराट अय्यर कौन बनेगा करोडपतीच्या ज्युनिअरच्या पहिल्याच आठवड्यात एक कोटी रुपयांचा प्रश्न खेळताना दिसला. विराट हा मूळचा छत्तीसगडमधील भिलाई येथे राहणारा आहे. त्याला १ कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का? काय होता प्रश्न जाणून घेऊया...
वाचा: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या
पीरियॉडिक टेबलमधील ९६ आणि १०९ अणुक्रमांक असलेल्या दोन घटकांच्या नावांमध्ये विशेष काय आहे? असा प्रश्न १ कोटी रुपयांसाठी विचारण्याता आला होता. त्यासाठी A-नोबेल विजेत्यांच्या नावांवर आधारित आहेत, B-महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आधारित आहेत, C-भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर आहेत आणि D-त्यांची नावे नाहीत असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर विराटला माहिती नव्हते आणि सर्व लाइफलाइ देखील संपल्या होत्या. त्यामुळे त्याने चुकीचे उत्तर दिले. त्याला केवळ ३ लाख २० हजार रुपये घेऊन घरी जावे लागले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर B महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आधारित आहेत हे होते.
विराट हा निलीमा अय्यर आणि कल्याण विजय यांचा मुलगा आहे. तो भिलाईमधील सेक्टर १० येथील श्री शंकराचार्य विद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला आतापर्यंत ३० पेक्षा जास्त अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आता केबीसीमध्ये देखील तो चांगला खेळताना दिसत होता. पण १ कोटी रुपयांचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे ३ लाख घेऊन घरी जावे लागले आहे.