
Kaun Banega Crorepati 15: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा सध्या १५वा सीझन सुरू आहे. केबीसी १५चा हा सिझन खास लहान मुलांसाठीचा आहे. या पर्वात नुकताच एक आठवीत शिकणारा चिमुकला सहभागी झाला होता. या लहानग्या मुलाने आपल्या अफाट बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करत एक कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील पाली गावात राहणारा मयंक आता करोडपती झाला आहे.
आठवीत शिकणारा मयंक ७ कोटी रुपये जिंकण्याचे स्वप्न घेऊन केबीसी १५मध्ये सामील झाला होता. मात्र, त्याच हे स्वप्न अधुरं राहिलं. ७ कोटींसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने मयंकने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. 'कौन बनेगा करोडपती' सीझन १५मध्ये सहभागी झालेल्या ज्युनिअर करोडपती मयंकचा खेळ पाहून शोचे होस्ट अमिताभ बच्चन देखील थक्क झाले होते. स्वतः बिग बींनी मयंकच्या खेळाचे खूप कौतुकही केले. इतक्या लहान वयातही मयंकची अफाट बुद्धिमत्ता पाहून सगळेच भारावून गेले होते.
एक कोटी रुपयांसाठी मयंकला विचारण्यात आलेला प्रश्न:
A -अब्राहम ऑर्टेलियस
B- गेराडस मर्केटर
C- जियोवानी बतिस्ता एग्नीस
D- मार्टिन वाल्डसीमुलर
मयंकने या प्रश्नाचं उत्तर देऊन एक कोटींचा डाव जिंकला आणि तो ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचला. मात्र, या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. पाहा कोणता प्रश्न होता..
A- तब्रिज
B- सिडॉन
C- बटूमि
D- अल्माटी
संबंधित बातम्या
