छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती सीझन १५' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो-करोडो रुपये जिंकताना दिसतात. १५ एप्रिल रोजी सुरु झालेला 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा २९ डिसेंबर शेवटचा एपिसोड झाला. या एपिसोडमध्ये शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन भावूक झाले आहेत.
'कौन बनेगा करोडपती १५'ला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा भावना दाटून आल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अमिताभ यांनी भावूक यांनी म्हटले की, देवी और सजनों आता आम्ही निघतोय. उद्यापासून हा मंच सजणार नाही. उद्यापासून इथे येणार नाही हे आपल्या प्रियजनांना सांगण्यासाठी हिंमत लागते आणि ही गोष्ट त्यांना सांगाविशी वाटत देखील नाही. मी, अमिताभ बच्चन, या सीजनमध्ये शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे - शुभ रात्री. त्यानंतर अमिताभ यांना अश्रू अनावर झाले.
वाचा: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
'कौन बनेगा करोडपती १५'च्या शेवटच्या भागात अभिनेत्री शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन यांनी हजेरी लावली. शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सुंदर आठवणी देखील शेअर केल्या. पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर 'कौन बनेगा करोडपती १५'चा प्रोमो व्हायरल झाला तो पाहून प्रेक्षकांनी बिग बींवर प्रेमाचा वर्षाव केला. भावूक झालेले अमिताभ सगळ्यांकडे बघत राहिले आणि ऐकत राहिले. यावेळी प्रेक्षकांपैकी एकाने म्हटले की, आमच्यापैकी कोणीही देव पाहिला नाही. पण आम्हाला देवाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला पाहण्याचे भाग्य मिळाले.