बॉलिवूडची ‘शीला’ अर्थात अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच मुंबईच्या कलिना विमानतळावर दिसली होती. कतरिना एअरपोर्टवर हलक्या लाल रंगाच्या बांधनी साडीत स्पॉट झाली. कतरिनाचा हा सुंदर ट्रेडिशनल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. आता कतरिना कैफचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये चाहत्यांना कतरिनाच्या हातावर एक काळा पॅच दिसला आहे. अभिनेत्रीच्या गोऱ्यापान हातावर हा ब्लॅक पॅच पाहून चाहत्यांना कतरिना कैफची चिंता सतावत आहे.
कतरिना कैफचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. अनेकांनी तिच्या या लूकवर फिदा झाल्याचे देखील म्हटले आहे. अनेक जण कमेंटमध्ये विकी कौशलला टॅग करत विचारत आहेत की, त्याने नक्की कोणत्या देवाची पूजा केली? एका युजरने लिहिले की, ‘ही किती सुंदर दिसते.’ तर एका दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’. एका व्यक्तीने विकीला उद्देशून विचारले की, ‘अशी पत्नी मिळवण्यासाठी किती आणि कोणते व्रत करावे लागतात?’
एकीकडे लोक कतरिना कैफचं तोंडभरून कौतुक करत आहेत. तर, आता काही युजर्सना कतरिनाच्या हातावर एक ब्लॅक पॅच दिसला असून, कतरिनाची तब्येत ठीक आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. त्याचवेळी एका युजरने कतरिनाच्या हातावर हा डायबेटिस पॅच आहे का? असा प्रश्न विचारला. एका व्यक्तीने लिहिले, ‘होय, हे शुगर मॉनिटरिंग मशीन आहे.’ एकाने लिहिले की, ‘मला आशा आहे की कॅट लवकरच बरी होईल.’
डायबेटिस पॅच त्वचेवर लावण्यात येणाऱ्या ग्लुकोज मॉनिटर (CGM) उपकरणाचा भाग आहे. हे उपकरण दिवसभर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी ट्रॅक करते आणि त्याचे परिणाम स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही उपकरणावर पाठवते. या पॅचला चिकटवता येण्यासाठी गोंद लावलेला असतो, जो त्वचेला चिकटतो आणि ट्रान्समीटर त्याच्याशी जोडतो व डेटा पाठवतो. जेव्हा पॅच बदलणे आवश्यक असते, तेव्हा ते बॅन्ड-एड प्रमाणे काढले जाऊ शकतो आणि नवीन पॅचने बदलला जाऊ शकतो.
कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकतीच ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कतरिनासोबत अभिनेता विजय सेतुपती दिसला होता. फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात कतरिना कैफ झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात कतरिनासोबत आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीही दिसणार आहेत.
संबंधित बातम्या