बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि कतरिना कैफ हि नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मेरी ख्रिसमस' थ्रिलर, मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स ड्रामा आणि अनेक ट्विस्ट असे एक रंजक मिश्रण आहे. 'अंधाधुन'च्या श्रीराम राघवन यांनी 'मेरी ख्रिसमस' प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आता हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? याबाबत माहिती समोर आली आहे.
वाचा: 'हे' सिनेमे कुटुंबीयांसोबत पाहण्याची हिंमत करु नका
मीडिया रिपोर्टनुसार, 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नेटफ्लिक्सने ६० कोटी रुपयांमध्ये या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीसोबत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टीनू आनंद हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी चित्रपटाने २.५५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ३.५० कोटी रुपये कमावले. जगभरात या चित्रपटाने ८ कोटी कमावले आहेत.