Viral Video on chadti jawani song: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी चांगल्या गोष्टी व्हायरल होतात तर कधी चुकीच्या गोष्टी देखील व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी 'चढती जवानी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावरील तिचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का? नाही ना चला पाहूया...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी ही अन्वी शाह आहे. अन्वी ही एक डान्सर आहे. तिचा एक स्टुडीओ आहे. ती या स्टुडीओमध्ये अनेकांना डान्सचे शिक्षण देत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये अन्वीने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची फ्लेअर पँट परिधान केली आहे. व्हिडीओमध्ये डान्स करतानाचा तिचा आत्मविश्वास आणि अदा प्रेक्षकांना घायाळ करत आहेत. अन्वीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत, "चढती जवानी मुंबईत होईल..." असे कॅप्शन दिले आहे.
अन्वी शाहचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत. काहींनी तर अन्वीचा डान्स हा अरुणा इराणीच्या मूळ नृत्यापेक्षाही सरस असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने तर अन्वीला लंडनमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यास सांगितले. "कृपया लंडनमध्ये कार्यशाळेसाठी यावे!!" अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या युझरने लिहिले "एकही बीट चुकली नाही". आणखी एका यूजरने "ती इतकी सहजतेने नृत्य करते" असे म्हटले आहे.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
'चढती जवानी' गाणे संगीत दिग्गज आर डी बरमन यांनी संगीतबद्ध केले आहे. तर भारतीय गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आवाजात 'चढती जवानी' रेकॉर्ड करण्यात आले आहे. १९७१साली प्रदर्शित झालेल्या कारवाँ या चित्रपटातील हे आयटम साँग आहे. या गाण्यात अरुणा इराणी दिसल्या होत्या. त्यांच्या डान्सची सर्वत्र प्रशंसा झाली होती. या गाण्यासाठी आरडी बरमन यांना फिल्मफेअरमधील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला होता. आता पुन्हा एकदा या गाण्यावरील तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या