मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिकी गायकवाडने चाहत्यांना दिली गुडन्यूज! डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

कार्तिकी गायकवाडने चाहत्यांना दिली गुडन्यूज! डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 29, 2024 03:34 PM IST

कुणीतरी येणार येणार गं! कार्तिकी गायकवाडच्या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या कमेंट.. चला पाहूया व्हिडीओ...

कार्तिकी गायकवाडने चाहत्यांना दिली गुडन्यूज! डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल
कार्तिकी गायकवाडने चाहत्यांना दिली गुडन्यूज! डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमाने कार्तिकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. तिने सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. २०२० साली तिने रोनित पिसेशी लग्न केले. त्यानंतर आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आले आहे. कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कार्तिकी आणि रोनितच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गूडन्यूज शेअर केली आहे. कार्तिकीच्या डोहाळे जेवणाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. कुणीतरी येणार येणार गं! असे कार्तिकीच्या व्हिडीओवर लिहिण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एण्ट्री व कुटुंबातील इतर सदस्यांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

डोहाळ जेवणासाठी कार्तिने खास लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर फुलांचे दागिने घातले होते. कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ फिल्मवाला या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
वाचा: देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट

कार्तिकीच्या डोहाळ जेवणाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी कार्तिकीला शुभेच्छा दिल्या असून नव्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात आहेत.
वाचा: परिणिती चोप्रा देणार चाहत्यांना गुडन्यूज? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

गेल्या वर्षी कार्तिकीने नवी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्तिनी ही लग्झरी कार खरेदी केली होती. ही गाडी किया कंपनीची होती. ही गाडी घेण्यासाठी कार्तिकीसोबत तिचे कुटुंबीय सुद्धा गेले होते. रोहितचा कागदपत्रांवर सही करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कार्तिकीने हा नव्या कारसोबतचा व्हिडीओ शेअर करत “ताफ्यात आणखी एकीचा समावेश…” असे कॅप्शन त्याने दिले आहे.

IPL_Entry_Point