Kartik Aryan : सफेद साडी नसलेली एक महिला समोर आली अन्...; कार्तिक आर्यनने खऱ्या आयुष्यात पाहिले भूत?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kartik Aryan : सफेद साडी नसलेली एक महिला समोर आली अन्...; कार्तिक आर्यनने खऱ्या आयुष्यात पाहिले भूत?

Kartik Aryan : सफेद साडी नसलेली एक महिला समोर आली अन्...; कार्तिक आर्यनने खऱ्या आयुष्यात पाहिले भूत?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 01, 2024 10:07 AM IST

Kartik Aryan : 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये कार्तिकने खऱ्या आयुष्यातील अनुभव सांगितला आहे.

Kartik Aryan
Kartik Aryan

दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा दिवाळीत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रियदर्शनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील क्लासिक कल्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. यावेळी भूल भुलैयाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त धमाल पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी तो कार्तिक आर्यनसोबत एक नाही तर दोन सुपरस्टारसोबत दिसणार आहेत. होय, विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशापरिस्थितीत चित्रपटाची संपूर्ण टीम आता प्रमोशनमध्ये गुंतली आहे. दरम्यान, कार्तिकने खऱ्या आयुष्यात भूतांचा अनुभव घेण्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

माधुरी-विद्यामधील कार्तिकची आवडती कोण?

रूह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यनने नुकतीच टेली चक्करला आपली मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याला विचारण्यात आले की, तुझी आवडती मंजुलिका कोण आहे? या प्रश्नाने कार्तिकला चांगलाच धक्का बसला. कार्तिक म्हणाला की, 'अहो दोन्हीमध्ये निवडणे खूप अवघड आहे. रूहबाबांची आवडती मंजुलिका असूच शकत नाही. कारण तो त्याविरुद्ध लढत आहे. मग लढण्यासाठी कोणी तरी फेव्हरिट कसे असू शकते? यावर त्याला विचारण्यात आले की, विद्या मॅमसोबत तुमचे खूप चांगले बॉन्डिंग आहे हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे ती फेव्हरेट असू शकते, असे वाटते. यावर अभिनेता म्हणतो की, त्यांच्यासोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे, आता तुम्ही माधुरीजींसोबतही पाहाल.

खऱ्या आयुष्यात भूतांचा सामना करावा लागला आहे का?

कार्तिकला या मुलाखतीमध्ये विचारले गेले की, 'भूतावर आधारित चित्रपटात भूल भुलैयामध्ये तुम्ही काम करताय, तुम्हाला खऱ्या आयुष्यात कधी असे काही जाणवले आहे का? तुम्ही मध्य प्रदेशचे आहात आणि तिथे अशा गोष्टी अधिक घडतात." त्यावर उत्तर देत कार्तिक म्हणाला की, हो पण मी असा अनुभव कधीच घेतला नाही. पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली स्त्री त्या वाटेवरून चालत गेल्याचे किस्से मी फक्त ऐकले आहेत. मला फक्त या वाटेने न जाण्याची भीती वाटत होती. कारण ती तिकडून जाते हे माहिती होते.

चित्रीकरणादरम्यान असं काही जाणवल्याच्या प्रश्नावर कार्तिक म्हणाला, असं काही च घडलं नाही, पण आम्ही अशा ठिकाणी नक्कीच शूट केलं जिथे रात्री कोणी जात नव्हतं.'
वाचा: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली

'भूल भुलैया ३' चित्रपटाविषयी

'भूल भुलैया ३' या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत. तगडी स्टार कास्ट असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

Whats_app_banner