Bhool Bhulaiyaa 3: विद्या बालन आणि माधुरी दीक्षित एकत्र! 'भूल भुलैया ३'चा हॉरर ट्रेलर पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhool Bhulaiyaa 3: विद्या बालन आणि माधुरी दीक्षित एकत्र! 'भूल भुलैया ३'चा हॉरर ट्रेलर पाहिलात का?

Bhool Bhulaiyaa 3: विद्या बालन आणि माधुरी दीक्षित एकत्र! 'भूल भुलैया ३'चा हॉरर ट्रेलर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 09, 2024 03:44 PM IST

Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Bhool Bhulaiyaa 3
Bhool Bhulaiyaa 3

बॉलिवूडमधील अतिशय हिट हॉरर कॉमेडी चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'भूल भुलैया.' या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागांना मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी 'भूल भुलैया ३'ची घोषणा केली. तेव्हा पासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांना पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?

'भूल भुलैया ३' चित्रपटाच्या ३ मिनिटे ४४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये भूत आणि प्रेत यावर विश्वास नसणाऱ्या कार्तिक आर्यनची जबरदस्त एण्ट्री दाखवली आहे. कार्तिकची एक कंपनी असते जी मेलेल्या लोकांच्या आत्म्याशी बोलते. कार्तिक स्वत: या फेक कंपनीमध्ये काम करत असतो. त्याने अनेकांना लुटले आहे. त्यानंतर त्याच्या आयुष्यात तृप्ती डिमरीची एण्ट्री होते. तो तिच्या अखंड प्रेमात बुडालेला असतो. त्यानंतर तो तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जातो. तेव्हा तो एका हवेलीमध्ये जातो. या हवेलीमध्ये मोंजोलिकीला कैद केलेले असते. कार्तिक एक दिवस अचानक हा हवेलीचा दरवाजा तोडतो. तेव्हा विद्या बालनची एण्ट्री होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित देखील दिसते. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर हा उत्सुकता वाढवणारा असल्याचे दिसत आहे.

लोकांनी ट्रेलर पाहून दिल्या प्रतिक्रिया

काही लोकांना माधुरी दीक्षितचा कॅमिओ मजेशीर वाटतो. माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्यातील डान्स फेस पाहण्यासाठी काही जण उत्सुक आहेत. काहीजण कार्तिक आर्यनच्या कॉमिक टायमिंगचे कौतुक करत आहेत. ट्रेलरमधील विद्या बालनचा अभिनय लोकांना फारसा आवडलेला नाही. एका यूजरने तर विद्या बालनचा अभिनय ओवर अॅक्टिंग असल्याचे म्हटले आहे.
वाचा: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

बॉलिवूडमधील दोन बडे सिनेमे आमनेसामने

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रोहित शेट्टीचा ' सिंघम अगेन ' हा चित्रपटही १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच १ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन आणि अजय देवगण यांच्यात जबरदस्त टक्कर होणार आहे. तसेच 'भूल भुलैया ३' या चित्रपटात कार्तिक आर्यन , माधुरी दीक्षित , तृप्ती डिमरी , राजपाल यादव , विद्या बालन आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत.

Whats_app_banner