कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. हा चित्रपट १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. कार्तिक या चित्रपटाला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट म्हणतो, कारण या व्यक्तिरेखेसाठी त्याने त्याच्या शरीरात अनेक बदल घडवून आणले आहेत. अभिनेत्याला बॉक्सर बनवणे हे या चित्रपटाचे सर्वात मोठे आव्हान होते. या दरम्यान कार्तिकला मुरलीकांत पेटकर यांच्या शैलीत बॉक्सिंग शिकण्यासाठी त्यांच्यासारखी शरीरयष्टी तयार करावी लागणार होती.
कार्तिकच्या शरीरात बदल घडवून आणण्यासाठी आणि बॉक्सिंग शिकण्यासाठी त्याला १४ महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्यावेळी कार्तिक ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता, त्यामुळे तो त्यासाठीही वेळ देत होता. याशिवाय तो प्रवास देखील करत होता. प्रवासासाठीचे दोन महिने सोडले तर, त्याच्याकडे यासाग्ल्यासाठी केवळ १२ महिने शिल्लक होते. याच वर्षभरामध्ये कार्तिकने १८ किलो वजन कमी केले. यासाठी तो दररोज व्यायाम करायचो. सकाळी कार्डिओ आणि बॉक्सिंग करायचा. तर, संध्याकाळी पुन्हा एक तास ते पाऊण तास व्यायाम करायचा, असे त्याचे व्यायामाचे वेळापत्रक होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले होते, त्याच्या खांद्याला आणि टाचांना दुखापत झाली होती.
दुखापतग्रस्त असूनही कार्तिकला सराव करावा लागायचा. याशिवाय व्यायाम आणि शूटिंगही करावे लागत होते. सहसा एखाद्या खेळाडूला सकाळी सराव करावा लागतो. दुपारी विश्रांती आणि नंतर संध्याकाळी प्रशिक्षण, असे वेळापत्रक असते. मात्र, कार्तिक एखाद्या ॲथलीटप्रमाणे व्यायाम करत होता, पण तो ॲथलीटचे जीवन जगत नव्हता. कारण तो सकाळी सराव करून, मग शूटिंगसाठी बाहेर जायचा. त्याला दिवसभरात अनेक वेळा शूटिंग करावे लागत होते. तर कधी रात्रीच्या वेळीही शूटिंग केले जात होते. दुपारी तो ट्रेनिंग करायचा. अनेकवेळा कार्तिकला ८ तासांची झोपही मिळत नव्हती. पण, या चित्रपटाचे शुटिंग ज्याप्रकारे सुरू होते आणि ज्या पद्धतीने त्याने त्याची शरीरयष्टी बनवली होती.
शूटिंग आणि ट्रेनिंगसोबतच कार्तिककडे इतर कामंही होती. यामुळेच त्याच्या खाण्याच्या सवयींमध्ये अचानक मोठे बदल करता आले नव्हते. वर्षभर त्याचा आहार बदलत राहिला. या काळात त्याने प्रथिनयुक्त आहारावर लक्ष केंद्रित केले. शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळावीत म्हणून त्याची साखरही बंद करण्यात आली होती. वर्षभरात अभिनेत्याने मिठाईला हात देखील लावला नव्हता. चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी दिग्दर्शक कबीर खानने कार्तिकला त्याच्या आवडत्या मिठाई खाऊ घातल्या. ट्रेलरमध्ये, कार्तिक एका सीनमध्ये धावताना दिसत आहे, ज्यामध्ये त्याच्या शरीराचे सर्व स्नायू दिसत आहेत. त्या विशिष्ट दृश्याच्या शूटिंगसाठी कार्तिकने पिण्याचे पाणी कमी केले आणि त्याच्या आहारातून मीठ देखील काढून टाकले. यामुळे त्याचे शरीर निर्जलित दिसले आणि स्नायू देखील स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत होते.