मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: चाहत्यांचे प्रेम कार्तिक आर्यनला पडले भारी! बॅरिकेड्स तुटले अन्...; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ बघाच

Viral Video: चाहत्यांचे प्रेम कार्तिक आर्यनला पडले भारी! बॅरिकेड्स तुटले अन्...; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ बघाच

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 29, 2024 01:36 PM IST

Kartik Aaryan Viral Video: नुकतीच कार्तिक आर्यनसोबत एक अशी घटना घडली, ज्यात अभिनेता दुखापतग्रस्त होता होता थोडक्यात बचावला.

Kartik Aaryan Viral Video Filmfare 2024
Kartik Aaryan Viral Video Filmfare 2024

Kartik Aaryan Viral Video: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. कार्तिक त्याच्या प्रत्येक चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकून घेतो. अभिनेत्याची फॅन फॉलोविंग देखील भरपूर आहे. कोणताही गॉडफादर नसताना देखील मनोरंजन विश्वात त्याने आपले पाय रोवले आहेत. भविष्यातील सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून देखील कार्तिक आर्यनचे नाव घेतले जाते. मात्र, आता त्याच्या चाहत्यांचे एक वेगळेच रूप सगळ्यांना पाहायला मिळाले आहे. यामुळे अभिनेत्याला देखील मोठा धक्का बसला आहे.

नुकतीच कार्तिक आर्यनसोबत एक अशी घटना घडली, ज्यात अभिनेता दुखापतग्रस्त होता होता थोडक्यात बचावला. नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनला पाहून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. चाहत्यांमुळे कार्यक्रमात मोठा अपघात झाल्याचे पाहून कार्तिक आर्यनलाही धक्का बसला होता. आता या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही घटना नेमकी कशी घडली, हे पाहताना क्षणभर तुमचा मेंदूही चक्रावून जाईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’च्या इव्हेंटमध्ये पोहोचताना दिसला आहे. जेव्हा तो स्टेजच्या दिशेने जात होता, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी त्याला पाहून आरडाओरडा सुरू केला. चाहत्यांना खूश करण्यासाठी कार्तिक आर्यन देखील त्यांच्याजवळ पोहोचला आणि हस्तांदोलन करू लागला. मात्र, या दरम्यान एका व्यक्तीने त्याचा हात पकडला आणि त्यावेळी कार्तिकने हात सोडवून, तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक चाहत्यांच्या जमाव त्याच्या दिशेने येऊ लागला आणि त्यांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले. बॅरिकेड अचानक पडताच अभिनेता कार्तिक आर्यन देखील घाबरून मागे सरकला, अन्यथा त्याला देखील गंभीर दुखापत झाली असती.

योग्यवेळी लक्ष दिल्यामुळे कार्तिक कार्तिक आर्यन थोडक्यात बचावला. अन्यथा, त्याला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असते. मात्र, या व्हिडीओमध्ये तिथे उभे असलेले अनेक लोक एकत्र पडताना दिसले आहेत. यावेळी कार्तिकच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे पाहायला मिळाली. मात्र, यानंतर त्याने स्वतःला सावरले आणि दुरूनच चाहत्यांशी संवाद साधला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

WhatsApp channel