मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या ३’ ते अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’; २०२४मध्ये रिलीज होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट!

कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या ३’ ते अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’; २०२४मध्ये रिलीज होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 19, 2024 07:29 PM IST

२०२४मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सर्व चित्रपटांची खास गोष्ट म्हणजे हे सगळे बड्या कलाकारांचे चित्रपट आहेत.

कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या ३’ ते अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’; २०२४मध्ये रिलीज होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट!
कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या ३’ ते अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’; २०२४मध्ये रिलीज होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट!

या वर्षात म्हणजेच २०२४मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सर्व चित्रपटांची खास गोष्ट म्हणजे हे सगळे बड्या कलाकारांचे चित्रपट आहेत, ज्यात सलमान खान, अजय देवगण, रणवीर सिंह आणि कार्तिक आर्यन यांच्या नावाचा समावेश आहे. यातील बहुतांश चित्रपट हे जुन्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. त्यामुळेच हे चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांच्या सिक्वेलमध्ये पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सिंघम अगेन

या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. 'सिंघम' चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. आता या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सिंघम अगेन' या दिवाळीमध्ये रिलीज होऊ शकतो. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह, विकी कौशल आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत.

भूल भुलैय्या ३

दिग्दर्शक अनीज बज्मी यांचा 'भूल भुलैय्या ३' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 'भूल भुलैय्या ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी मार्चपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, चित्रपटाचे लोकेशन सातत्याने बदलले जात आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत विद्या बालन आणि तृप्ती डिमरी देखील दिसणार आहेत. 'भूल भुलैय्या ३' चित्रपटात कार्तिक आर्यन रूह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, विद्या बालन मंजुलिका म्हणून पुनरागमन करत आहे. 'भूल भुलैय्या १' या चित्रपटात विद्याने मंजुलिकाची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात माधुरी दीक्षितची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

साक्षीचं बिंग फुटणार! सायली आणि अर्जुन चैतन्यला वाचवू शकणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

गेम चेंजर

राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट खूप खास असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना राम चरण दोन व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहेत. याबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे. हा एक राजकीय ड्रामा चित्रपट आहे. 'गेम चेंजर'मध्ये राम चरण, कियारा अडवाणी, श्रीकांत, एसजे सूर्या, सुनील, नस्सर, जयराम, अंजली आणि समुथिराकणी अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

लीला सांभाळू शकेल का अभिरामने दिलेली अंगठी? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

प्रेम की शादी

सलमान खानच्या 'प्रेम की शादी' या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत. कारण, सलमान या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा सूरज बडजात्यासोबत काम करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे नाव 'प्रेम की शादी' ठेवण्यात आले आहे. यामध्ये सलमान खान पुन्हा एकदा ‘प्रेम’च्या भूमिकेत पडद्यावर झलकणार आहे. हा चित्रपट २०२४च्या दिवाळीला प्रदर्शित होऊ शकतो. सलमान खानने याआधी सूरज बडजात्यासोबत 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ हैं' आणि 'प्रेम रतन धन पायो' सारख्या चित्रपटात काम केले आहे. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते.

हेरा फेरी ४

अक्षय कुमार, परेशा रावल आणि सुनील शेट्टी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हेरा फेरी ४' बद्दल सगळ्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. चित्रपटाचे निर्माते २०२४च्या दिवाळीला 'हेरा फेरी ४' रिलीज करू शकतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे आणि आता लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग