मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मी दोन मैत्रिणींना डेट केलं, पण आता त्याची लाज वाटते’; कार्तिक आर्यनचा नेमका इशारा कुणाकडे?

‘मी दोन मैत्रिणींना डेट केलं, पण आता त्याची लाज वाटते’; कार्तिक आर्यनचा नेमका इशारा कुणाकडे?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 12, 2024 10:08 AM IST

कार्तिक आर्यन नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर विथ नेहा’मध्ये दिसला आहे, जिथे त्याने चित्रपटांसोबतच त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

‘मी दोन मैत्रिणींना डेट केलं, पण आता त्याची लाज वाटते’; कार्तिक आर्यनचा नेमका इशारा कुणाकडे?
‘मी दोन मैत्रिणींना डेट केलं, पण आता त्याची लाज वाटते’; कार्तिक आर्यनचा नेमका इशारा कुणाकडे?

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन याच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. अलीकडेच तो कोलकाता येथे 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिसला होता. चित्रपटांसोबतच कार्तिक त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. अभिनेत्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणे आवडते. अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. पण, आता या अभिनेत्याने आपल्या रिलेशनबद्दल उघडपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी कार्तिकने बॉलिवूडच्या दोन ‘बेस्ट फ्रेंड्स’ना डेट केल्याच्या गोष्टीवर खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिक आर्यनचा धक्कादायक खुलासा!

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. या यादीत सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या नावांचाही समावेश आहे. मात्र, ‘भूल भुलैया ३’ फेम या अभिनेत्याने या बातम्यांवर नेहमीच मौन बाळगले होते. आता कार्तिक आर्यन नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर विथ नेहा’मध्ये दिसला आहे, जिथे त्याने चित्रपटांसोबतच त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

१२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव

या शोदरम्यान नेहाने कार्तिकला विचारले की, दोन मैत्रिणींना एकत्र डेट केल्याबद्दल लाज वाटते का? तर, यावर बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘मी कधीही दोन मैत्रिणींना एकत्र डेट केले नाही. पण हो, नंतर त्या दोघेही चांगल्या मैत्रिणी बनल्या. जर, तुम्ही ही गोष्ट काऊंट करत असाल, तर म्हणू शकतो की, मी दोन मैत्रिणींना डेट केले आहे आणि मला याची लाजही वाटते.’ कार्तिक आर्यन याने अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या ‘बॉलिवूड बेस्टीं’ना डेट केले होते.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...

कार्तिक आर्यन अजूनही सिंगल का आहे?

जेव्हा नेहाने कार्तिकला त्याच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की तो गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे आणि यासाठी त्याने त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'ला दोष दिला. कार्तिक म्हणाला, 'खरं सांगू तर, मी गेल्या २ वर्षांपासून सिंगल आहे. मी ‘चंदू चॅम्पियन’च्या तयारीत व्यस्त होतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक चित्रपट आहे. या चित्रपटासाठी माझ्याकडून खूप समर्पण आवश्यक आहे आणि म्हणूनच मी गेल्या २ वर्षात एकही डेटिंग केली नाही.’ यावेळी कार्तिक म्हणाला की, सध्या तो सिंगल असून, प्रेमाच्या शोधात आहे.

कार्तिक कामात व्यस्त!

नेहाने कार्तिकला असेही विचारले की, जर तू एखाद्या पार्टीत तुझ्या एक्सशी धडकलास, तर तू तिला काय विचारशील?’ यावर कार्तिक गमतीने म्हणाला की, 'मी तिला विचारेन तुझी सध्याची परिस्थिती कशी आहे?' अभिनेत्याच्या या उत्तरावर नेहा मोठ्याने हसली. कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे दोन मोठे चित्रपट 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया ३' या वर्षी रिलीज होणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग