Kartik Aaryan : ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन सिंगल की मिंगल? विद्या बालनने गुपित सांगूनच टाकलं! म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kartik Aaryan : ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन सिंगल की मिंगल? विद्या बालनने गुपित सांगूनच टाकलं! म्हणाली...

Kartik Aaryan : ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन सिंगल की मिंगल? विद्या बालनने गुपित सांगूनच टाकलं! म्हणाली...

Published Oct 29, 2024 05:49 PM IST

Kartik Aaryan Relationship Status : विद्या बालन आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान विद्या बालन कार्तिक आर्यनच्या आयुष्यावर बोलली आहे.

कार्तिक आर्यन आणि विद्या बालन
कार्तिक आर्यन आणि विद्या बालन

Kartik Aaryan Relationship Status : बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दोघेही पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. कार्तिकची फीमेल फॅन फॉलोइंग किती जबरदस्त आहे, हे आता सगळ्यांनाच माहित आहे. त्याचा चाहता वर्ग त्याच्यासाठी अगदी क्रेझी आहे. त्याचबरोबर कार्तिकचे अनेक अभिनेत्रींसोबतही नाव जोडले गेले आहे. पण आता कार्तिकचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. तर, विद्याने नुकतंच कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक संकेत दिला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये एका महिला चाहत्याने कार्तिकला एक कविता समर्पित केली आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावर बोलताना विद्या म्हणाली की, काही लोकांना अटेंशन आवडत नाही, असे म्हणतात. पण, असे म्हणणारे लोक साफ खोटं बोलत असतात. पुढे विद्या हसली आणि म्हणाली की, ‘जेव्हा लोक हे असं काही म्हणतात, विशेषत: अभिनेते, पुरुष कलाकार आणि कार्तिक आर्यन, तेव्हा ते खोटेच असते. यात अजिबात दुमत नाही. उलट त्यांना खूप मजा येत असते.’

Arjun Kapoor Video : ‘मी आता सिंगल आहे’; अखेर अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडलं!

कार्तिकच्या हृदयाचे दरवाजे उघडे!

विद्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना कार्तिक आर्यन म्हाणाला की, ‘पण मी कधी म्हणालो की मला लोकांचे अटेंशन आवडत नाही. मला आवडतं, मग ते पुरुषांचं अटेंशन असो किंवा स्त्रीचं अटेंशन.’ यावर विद्या पुढे म्हणाली की, ‘हो अगदी बरोबर आहे, तू आता तुझ्या हृदयाचे दरवाजे जे उघडले आहेस. हा पण, मला तुला काही सल्ला द्यायचा असेल, तर मी म्हणेन की आता आयुष्यात एकीला तरी आण.’

पहिल्यादांच स्क्रीन शेअर करणार कार्तिक-विद्या

कार्तिकसोबतच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोलताना विद्या म्हणाली की, 'आम्ही एकत्र खूप मजा केली. अभिनेत्रीने कार्तिकच्या सेन्स ऑफ ह्यूमरचे ही कौतुक केले. विद्या म्हणाली की, चित्रपट सुरू होण्याआधीच आम्हा दोघांची मैत्री झाली होती.

‘भूल भुलैया ३'बद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत विद्या, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत. याच दिवशी हा चित्रपट रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’शी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे.

Whats_app_banner