Day 1: 'भूल भुलैया ३' सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? चला जाणून घेऊया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Day 1: 'भूल भुलैया ३' सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? चला जाणून घेऊया

Day 1: 'भूल भुलैया ३' सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? चला जाणून घेऊया

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 01, 2024 11:34 AM IST

Bhool Bhulaiyaa 3 Day 1 Box Office: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Bhool Bhulaiyaa 3 Day 1 Box Office Collection
Bhool Bhulaiyaa 3 Day 1 Box Office Collection

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाशी या चित्रपटाची थेट स्पर्धा असली तरी दोन्ही चित्रपटांची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी आपल्या आवडत्या फ्रँचायझीसाठी अडवान्स तिकीट बुकींग केली आहे.

पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती?

विद्या बालनचे कमबॅक आणि माधुरी दीक्षितचे नाट्यमय पुनरागमन बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया ३'च्या माध्यमातून किती कमाई करू शकते. ट्रेड एक्सपर्ट्सच्या मते ही फ्रँचायझी खूप लोकप्रिय आहे आणि मागील भागात कार्तिक आर्यनला मिळालेल्या प्रेमामुळे या चित्रपटातही चमत्कार करण्याची क्षमता आहे. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन २३ ते २५ कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. म्हणजेच चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन जवळपास २७ ते २९ कोटी असण्याची शक्यता आहे.

जगभरात किती कमाई केली?

एकीकडे एक निर्माते चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन ३० कोटींच्या वर जाईल, असा दावा करत आहेत, तर दुसरीकडे ट्रेड एक्सपर्टचे गणित वेगळीच कहाणी सांगत आहे. पण एका हिशोबानुसार कार्तिक आर्यनचा हा चित्रपट ३० कोटींच्या वर बिझनेस करू शकतो. त्यात परदेशातील कलेक्शन भर घालत आहे. रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनची फॅन फॉलोइंग लक्षात घेता या चित्रपटाचे परदेशातील कलेक्शन जवळपास ७ कोटी रुपये आहे.
वाचा: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली

पहिल्या भागाविषयी

'भूल भुलैया ३' या चित्रपटाचा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य नायक होता आणि हा हॉरर कॉमेडी चित्रपट सुपरहिट ठरला होता. वर्ष 2022 मध्ये याचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता ज्यात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतली होती आणि आता तो हा वारसा पुढे नेणार असल्याचे दिसत आहे. मागील भागाच्या तुलनेत यंदा अभिनेत्री नक्कीच बदलली आहे कारण यावेळी तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Whats_app_banner