Kartik-Sara: ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र दिसले कार्तिक अन् सारा; सोशल मीडियावर ‘त्या’ चर्चांना उधाण!
Kartik Aaryan-Sara Ali Khan : कार्तिक आणि सारा अली खानचे हे फोटो समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
Kartik Aaryan-Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'शहजादा' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. एकीकडे हा चित्रपट सतत लांबणीवर पडत असताना, दुसरीकडे कार्तिक या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. सध्या अभिनेता उदयपूरमध्ये असून, चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटला हजेरी लावत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानसोबत स्पॉट झाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कार्तिक आणि सारा अली खानचे हे फोटो समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. यात कार्तिक आर्यन चेक्स शर्टमध्ये दिसत आहे, तर सारा पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. प्रत्येक चाहत्याच्या मनात एकच प्रश्न आहे की, हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत का?
सोशल मीडियावर चाहते या फोटोंचा व्हॅलेंटाइन डेशीही संबंध जोडत आहेत. चाहत्यांनी या जोडीला ‘सार्तिक’ असे नाव दिले आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खानने 'लव्ह आज कल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. या दोघांची प्रेमकहाणी ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. मात्र, ही प्रेमकहाणी काही वर्षांतच संपली. याचा खुलासा खुद्द करण जोहरने 'कॉफी विथ करण' सीझन ७मध्ये केला होता. या आधी देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार्तिक आणि साराच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.