मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील! ‘कर्मवीरायण’चा ट्रेलर बघाच

समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील! ‘कर्मवीरायण’चा ट्रेलर बघाच

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 09, 2024 01:38 PM IST

‘कर्मवीरायण’ या ट्रेलरमधून चित्रपटाची आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्याची झलक पाहायला मिळाली आहे.

समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील! ‘कर्मवीरायण’चा ट्रेलर बघाच
समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील! ‘कर्मवीरायण’चा ट्रेलर बघाच

समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देण्यात एक अत्यंत महत्वाची भूमिका पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बजावली आहे. अशा या महान विभूतींच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित ‘कर्मवीरायण’ हा चित्रपट येत्या १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून चित्रपटाची आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्याची झलक पाहायला मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनीही छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपत होस्टेल्स सुरु केली. त्या हॉस्टेल्समध्ये त्यांनी शिक्षण घेऊ इच्छीत असणाऱ्या मुलांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यामुळे सर्व जातीधर्मातील मुले एका छताखाली गुण्यागोविंदाने शिकू लागली. आणि उच्चवर्णीय व उच्चवर्गीयांपर्यंतच मर्यादित असलेले शिक्षण त्यांनी तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवले. त्यांनी सुरु केलेल्या शाहू बोर्डिंग हाउसला महात्मा गांधी ह्यांनीही भेट दिली होती.समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देण्यात एक अत्यंत महत्वाची भूमिका कर्मवीर भाऊराव पाटील यांचा थक्क करणारा प्रवास आपल्याला ‘कर्मवीरायण’ या चित्रपटातून पाहता येणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा थक्क करणारा प्रवास!

लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे, असा भाऊराव पाटील यांचा पक्का विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र, समाजाचा विरोधाला अजिबात न जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिले आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली.

दिग्गज कलाकारांची फौज

ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या ‘कर्मवीरायण’ चित्रपटाची प्रस्तुती ७ वंडर्सचे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. अभिनेते किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, तनया जोशी, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण,संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

IPL_Entry_Point