मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kareena Kapoor: करीनाने नकार दिलेल्या या चित्रपटाने बदलले कंगनाचे आयुष्य

Kareena Kapoor: करीनाने नकार दिलेल्या या चित्रपटाने बदलले कंगनाचे आयुष्य

Aarti Vilas Borade HT Marathi
May 10, 2023 04:02 PM IST

Kangana Ranut: करीना कपूर खानने नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी कंगना रणौतला चित्रपटाविषयी विचारले..

Kareena Kapoor
Kareena Kapoor

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच वरचढ ठरते. तिच्या वक्तव्याची चर्चा असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मते मांडताना दिसते. बराच वेळा तिला या सर्वामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र कंगना याकडे दुर्लक्ष करते. करिअरच्या सुरुवातीचा काळ कंगनासाठी कठीण होता. मात्र, अभिनेत्री करीना कपूर खानने नकार दिलेल्या चित्रपटाची ऑफर कंगनाला मिळाली आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले.

गेल्या १७ वर्षांपासून कंगना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांमधील बोल्ड सीन्स चर्चेत राहिले. कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. तिला हे नाव करीना कपूरमुळे मिळाले आहे.
वाचा:'या' दिवशी सुरु होणार 'कोण होणार करोडती', घर बसल्या करोडपती होण्याची संधी

७ मार्च २०१४ साली प्रदर्शित झालेला क्वीन या चित्रपटाने कंगनाचे करिअर एका उंचीवर नेले. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटासाठी कंगना रणौत निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. तिच्या ऐवजी अभिनेत्री करीना कपूर खानला विचारण्यात आले होते. मात्र, करीनाने काही कारणास्तव या चित्रपटाला नकार दिला.

कामाविषयी बोलायचे झाले तर कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.

WhatsApp channel