Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो म्हणून अभिनेत्री करीना कपूर खान ओळखली जाते. करीना नेहमीच तिच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये करीना कपूरने सेक्स सीन्स का देत नाही या मागचे कारण सांगितले होते. तसेच अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या ‘मर्डर’ या सिनेमाचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे मल्लिकावर निशाणा साधला होता. चला जाणून घेऊया करीना नेमंक काय म्हणाली.
सोशल मीडियावर करीनाच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, ती अभिनेते राज कपूर यांची नात आहे आणि त्यामुळे सेक्स सीन्स देऊ शकत नाही. तसेच मर्डर या चित्रपटात शरीर प्रदर्शन असल्याचे तिने म्हटले. मल्लिका आणि करीना यांच्यामधील भांडण हे जगजाहीर आहे. त्या दोघींनी जीना सिर्फ तेरे लिए चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे सेटवरही खटके उडत असल्याचे सांगितले होते.
करीना कपूरची ही जुनी मुलाखत रेडिटवर शेअर करण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये करीना सय्यद फिरदौस असरफशी बोलताना दिसत आहे. 'जेव्हा ट्रेड लोकांनी चमेलीला पाहिले तेव्हा ते म्हणाले, चमेलीमध्ये सेक्स मिसिंग आहे. त्यांना हे समजत नाही की वहिदा यांनी प्यासामध्ये सेक्स सीन केला नाही. माफ करा पण राज कपूर यांच्या नातीकडून अशी अपेक्षा करणे तुम्ही सोडायला हवे.
करीनाने मल्लिका शेरावतच्या वक्तव्याचाही समाचार घेतला होता. ज्यामध्ये तिने म्हटले की, राज कपूर यांच्या अभिनेत्रीही अंगप्रदर्शन करत होत्या. त्यामुळे त्यांना कळत नाही की त्या काय बोलत आहेत. राज कपूर यांनी नेहमीच अभिनेत्रींना अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
करीनाने मुद्दा मल्लिका शेरावतवर निशाणा साधला होता. तिने म्हटले की, 'मल्लिकाच्या मर्डर सिनेमात जास्तच अंगप्रदर्शन करण्यात आले आहे.' पुढे तिने सांगितले की तिला या सिनेमावर किंवा मल्लिकावर टीका करायची नाही. 'हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट होता. हे हास्यास्पद आहे. मी चित्रपट पाहिला आणि तो चांगला होता. त्यात जरा जास्तच एक्सपोजर आहे असं मला वाटलं' असे करीना म्हणाली.
संबंधित बातम्या