द ग्रेट इंडियन कपिल शोच्या ताज्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध बहिणींनी भाग घेतला होता. करिना कपूर तिची बहीण करिश्मासोबत शोमध्ये आली होती. या शोमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चर्चा केली. बहीण करिश्माला अभिनय करताना पाहून अभिनयाची आवड निवड झाल्याचे करीनाने सांगितले. 'करिश्माच्या चित्रपटाच्या बहुतांश सेटवर ती जात असे' असे करीना म्हणाली. त्यानंतर पुढे करीनाने सैफविषयी देखील मोठा खुलासा केला.
कपिल शर्माने करीनाला विचारले की तू लग्नापूर्वी सैफ अली खानसोबत अनेक सिनेमे केलेस, पण लग्नानंतर तू एकत्र चित्रपट का केला नाहीस? लग्नाआधी तू ओमकारा, कुर्बान, एजंट विनोद आणि टशन सारखे सिनेमे केले होतेस. लग्नानंतर घरातच रोमान्स करायचं ठरवलं होतं का? यावर करीना म्हणाली, 'अरे ज्या चित्रपटांची नावे घेतलीस ते चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे कोणीही आम्हाला एकत्र साईन केले नाही. यापेक्षा आम्ही लग्न करायचं ठरवलं.'
'द कपिल शर्मा शो'मध्ये करीना कपूरने सैफच्या हातावर करिनाच्या नावाच्या टॅटूचा किस्साही सांगितला होता. करीनाने सैफला सांगितले होते की, जर त्याचे तिच्यावर प्रेम असेल तर हातावर तिच्या नावाचा टॅट्यू काढेल. सैफने खरच मनावर घेतलं आणि टॅट्यू काढला.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी
करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. सैफ अली खानचं हे दुसरं लग्न होतं. यापूर्वी सैफ अली खानने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. मात्र, नंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. करिना आणि सैफला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तैमूर करिनाचा मोठा मुलगा आहे. तर जेह करिनाचा धाकटा मुलगा आहे.