Kareena Kapoor Meet PM Narendra Modi : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते राज कपूर यांची १००वी जयंती १४ डिसेंबर रोजी आहे. या जयंतीनिमित्त खास सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कपूर कुठूंबातील काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करीनाचा लेक तैमूर आणि जेहसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
करीना कपूर ने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करीना कपूरसोबत अभिनेता सैफ अली खान, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धीमा कूपर, नीतू कपूर देखील दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत करीनाने, "आमचे आजोबा, महान अभिनेते राज कपूर यांचे विलक्षण जीवन आणि वारसा साजरा करण्यासाठी त्यांच्या जयंतीचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही आमंत्रण दिल्याबद्दल अभिमान वाटतो" असे कॅप्शन दिले आहे.
पुढे करीना म्हणाली, "या खास दुपारबद्दल धन्यवाद मोदीजी. हा मैलाचा दगड साजरा करण्यासाठी तुमची आपुलकी, लक्ष आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. १३ - १५ डिसेंबर रोजी राज कपूर यांना १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये त्यांचे १० आयकॉनिक सिनेमे ४० शहरांतील १३५ चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहेत." सध्या सोशल मीडियावर करीनाची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकजण त्यावर कमेंट करुन ही सिनेमे कुठे पाहायला मिळणार असे विचारत आहेत.
वाचा : सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
या भेटीमध्ये नरेंद्र मोदी यांनी तैमूर आणि जेह साठी एक खास पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या नावासोबत काय लिहिलं हे करीनाने दाखवलं नाही. पण ही पोस्ट तिच्या मुलांसाठी खास असल्याचे तिने म्हटले आहे. बाकी इतर फोटोंमध्ये करीना, करिश्मा, नीतू सिंग , आलिया, रिद्धिमा तिचा नवरा, राज कपूरच्या मुली , रणबीर कपूर, सैफ आणि करीना च्या मावशीच्या मुलासोबत दिसत आहे.
संबंधित बातम्या