Kareena Kapoor Video: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. करीनाची दोन्ही मुले तैमुर आणि जहांगिर देखील कायमच फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा छोटा मुलगा जेह ज्या प्रकारे वागत आहे ते पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.
करीना कपूर ही नुकताच तिच्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत दोन्ही मुले देखील होती. करीना कारमधून खाली उतरते. त्यानंतर तिची दोन्ही मुले देखील कारमधून खाली उतरतात. एका बाजूने तैमुर उरतो आणि दुसऱ्या बाजूने जेह चिडलेला दिसत आहे. जेहच्या हातात टिश्यू पेपर असतो. तो रागाच्या भरात तो खाली फेकतो. तेवढ्यात त्याला सांभाळणारी नॅनी तो कागद उचलते. हे सगळं पाहून करीना जेहला काही न बोलताच तेथून निघून जाते. हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वाचा: ‘गंगुबाई काठियावाडी’मधील अभिनेत्याची झाली फसवणूक, बँक अकाऊंट झाले हॅक
सोशल मीडियावर करीनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने ‘ही अशी कशी आई आहे, जी मुलांना चांगल्या सवयी शिकवत नाही. तिने तिच्या मुलाला तो कागद उचलायला सांगितले पाहिजे होते’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘शिष्टाचार हा रोजच्या सवयीचा भाग असला पाहिजे आणि लहान मुलांना ते शिकवले पाहिजे. मला या व्हिडीओत तीन जण असे दिसत आहेत, ज्यांना हा शिष्टाचारच माहीत नाही’ असे म्हणत करीनाला सुनावले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘लहान मुलांचे मूड्स सतत बदलत असतात. तो जसजसा मोठा होईल, तसतसं शिकत जाई. लहान मुलांबद्दल तरी अशी मतं बनवू नका’ अशी कमेंट केली आहे.
करीना कपूरने बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानशी १६ ऑक्टोबर २०१२ साली लग्न केले. लग्नाच्या ५ वर्षांनंतर त्यांना तैमुर झाला. सुरुवातीला तैमुरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर २०२१मध्ये करीना पुन्हा आई झाली. तिने जहांगिरला जन्म दिला. सर्वजण त्याला जेह या नावाने आवाज देतात. सध्या जेहचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.