बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे सर्वांचे आवडते कपल आहे. 'टशन' या चित्रपटाच्या वेळी करीना आणि सैफची ओळख झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा अभिनेता अक्षय कुमारला याविषयी कळाले तेव्हा अक्षयने सैफ अली खानला धमकी दिली होती. आता अक्षय सैफला नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया...
सैफ आणि करीना यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात त्या दोघांसोबत अभिनेता अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. करीनाने एका मुलाखतीमध्ये 'टशन' सेटवरचा किस्सा सांगितला होता. जेव्हा अक्षयला कळाले की सैफ आणि माझे अफेअर सुरु आहे. तेव्हा अक्षय सैफकडे गेला आणि त्याला धमकी दिली. 'अक्षयने सैफला बाजूला घेतले होते आणि ही भयानक मुलगी आहे. ती एका खतरनाक कुटुंबातून आली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना विचार कर' असा धमकी वजा इशारा सैफला दिला होता.
करीनाने अक्षय कुमारची पत्नी ट्विंकस खन्नाच्या 'ट्वीक इंडिया' या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करीनाने हा किस्सा सांगितला होता. करीनाने ट्विंकलला अक्षय काय म्हणाला हे सांगितले. त्यावर ट्विंकलने ‘हा तर चांगला सल्ला दिला होता’ असे म्हटले. पुढे करीना म्हणाली, सैफला अक्षयने धमकी दिली होती आणि माझ्यासोबत चुकीचे वागू नकोस असे देखील सांगितले होते.
वाचा: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
करीना आणि सैफने जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केले. त्यामधील पाच वर्षे ते लिव्हइनमध्ये राहात होते. त्यानंतर दोघांनी कुटुंबाचा विचार करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १६ ऑक्टेबर २०१२ रोजी दोघे लग्नबंधानत अडकले. लग्नाच्या ४ वर्षानंतर २० डिसेंबर २०१६ साली सैफ आणि करीनाला तैमूर हा पहिला मुलगा झाला. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ असा आवाज देतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जहांगिर’ असे आहे. करीना त्याला जेह म्हणून आवाज देते.
संबंधित बातम्या