बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर स्वत: करीनाने प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
करीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत प्रेग्नंट नसल्याचे सांगितले आहे. तसेच केवळ पास्ता आणि वाइन पिण्यामुळे वजन वाढले आहे याची देखील कबूली करीनाने दिली आहे. त्यासोबतच तिने मजेशीर अंदाजात सैफने देशातील लोकसंख्या वाढण्यावत आधीच योगदान दिले आहे असे देखील म्हटले आहे.
करीनाने मजेशीर अंदाजात स्टोरी शेअर करत 'हे पास्ता आणि वाइन पिण्यामुळे झाले आहे. मी प्रेग्नंट नाही. सैफ म्हणतोय की त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यात योगदान दिले आहे' असे करीना म्हणाली.
सध्या करीना लंडनमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर ती तेथील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. त्यामधील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत होता. तो फोटो पाहून नेटकऱ्यांनी करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याचा अनुमान लावला होता. पण आता करीनाने व्यक्तव्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
संबंधित बातम्या