मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Crew Trailer:एअर हॉस्टेस बनून करीना-क्रिती-तब्बू करणार धमाल! ‘क्रू’चा धमाकेदार ट्रेलर पाहिला का?

Crew Trailer:एअर हॉस्टेस बनून करीना-क्रिती-तब्बू करणार धमाल! ‘क्रू’चा धमाकेदार ट्रेलर पाहिला का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 17, 2024 07:55 AM IST

Kareena Kapoor Khan Film Crew Trailer Out: 'क्रू' या चित्रपटात तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

‘क्रू’चा धमाकेदार ट्रेलर पाहिला का?
‘क्रू’चा धमाकेदार ट्रेलर पाहिला का?

Kareena Kapoor Khan Film The Crew Trailer Out: मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या 'द क्रू' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी 'द क्रू' या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाची छोटीशी झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अनेक पटींनी वाढली होती. या चित्रपटात तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. आता 'द क्रू' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेननसह दिलजीत दोसांझची एक दमदार झलक ट्रेलरमध्ये दिसली.

'क्रू' चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक अधिकारी म्हणतो, ‘सोनं कुठे आहे?’ आणि या संवादानंतर करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांचा गोंधळ आणि गदारोळ असलेला प्रवास सुरू होतो. या चित्रपटात कोहिनूर नावाची एक विमान कंपनी आहे, जिच्याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.

Anuradha Paudwal BJP : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश! निवडणूक लढणार?

या ट्रेलरमध्ये दिसते की, एका क्षणी तब्बूला कळते की, ती ज्या कंपनीसाठी काम करत आहे, ती कंपनी दिवाळखोर झाली आहे. तर, त्या तिघींच्याही आयुष्यात आपापले संघर्ष आहेत. दरम्यान, त्यांना एक प्रवाशी भेटतो, जो मृत असून त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत. इथून कथेत ट्विस्ट येतो. आपली सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, त्या या व्यक्तीकडचे सोने चोरायचे ठरवतात. कस्टम अधिकारी म्हणून दिलजीत दोसांझची एन्ट्री झाल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट येणार आहे. तर, कॉमेडियन कपिल शर्माची भूमिकाही खूप महत्त्वाची असल्याचे दिसते आहे. एकूणच, ‘द क्रू’चा ट्रेलर एक पूर्ण मनोरंजन पॅकेज आहे, ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन या चोरीतून सुटू शकतील का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे.

'क्रू' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, हे त्रिकूट चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून देणार आहे. या चित्रपटात तिघीही एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तिन्ही स्टार्सच्या दमदार अभिनयासोबतच धमाकेदार कॉमेडी देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'क्रू' हा चित्रपट २९ मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

IPL_Entry_Point