मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kareena Kapoor Khan: वर्षाच्या ‘या’ महिन्यांमध्ये करीना आणि सैफ अली खान कामच करत नाहीत! कारण ऐकलंत का?

Kareena Kapoor Khan: वर्षाच्या ‘या’ महिन्यांमध्ये करीना आणि सैफ अली खान कामच करत नाहीत! कारण ऐकलंत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 26, 2024 08:36 AM IST

Kareena Kapoor Khan-Saif Ali Khan: करीना कपूर खानने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि तिचा पती सैफ दरवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान कोणत्याही प्रोजेक्टचे शूटिंग करत नाहीत.

Kareena Kapoor and saif ali khan
Kareena Kapoor and saif ali khan

Kareena Kapoor Khan-Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपल मानले जातात. त्यांच्या वयात १० वर्षांचे अंतर असले, तरी दोघांची जोडी एकत्र खूप क्यूट दिसते. त्यांच्या या नात्यावर वयाचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. करीना आणि सैफ नेहमीच एकमेकांची जाहीर स्तुती करताना देखील दिसतात. दरम्यान, आता अभिनेत्रीने तिच्या आणि सैफच्या व्यावसायिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. करीनाने एका मुलाखतीत म्हटले की, तिने आणि तिचा पती सैफ अली खान यांनी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दोघेही जून ते ऑगस्ट दरम्यान कोणत्याही शूटिंगपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवतात.

मीडिया रिपोर्टनुसार, नुकतेच करीना कपूर खानने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि तिचा पती सैफ दरवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान कोणत्याही प्रोजेक्टचे शूटिंग करत नाहीत. यामागे त्यांनी एक खास कारण सांगितले आहे. अभिनेत्रीने करीना कपूर काह्न हिने म्हटले की, जेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त असते, तेव्हा तिचा पती अर्थात अभिनेता सैफ अली खान हा तैमूर आणि जेह यांची घरी काळजी घेतो. तर, सैफ कामात व्यस्त असताना करीना आपल्या मुलांसोबत वेळ घालवते.

Trending: 'माझ्यात काय कमतरता आहे? घटस्फोटानंतर आमिर खाननं किरण रावला विचारलं; मिळालं 'हे' उत्तर

का घेतात मोठी सुट्टी?

पुढे करीना कपूर म्हणाली ई, 'आम्ही दोघे वर्षाच्या काही महिने आलटून पालटून काम करतो. म्हणूनच दरवर्षी जून ते ऑगस्ट या काळात सगळ्या शूटिंगमधून ब्रेकवर घेतो. या दरम्यान तैमूर अली खान याच्या शाळेला जून ते ऑगस्ट दरम्यान सर्वात मोठी सुट्टी असते. आणि म्हणूनच या काळात आम्ही मुलांसोबत सुट्टीवर जातो किंवा त्यांच्यासोबत घरी जास्तीत जास्त वेळ घालवतो.’

आगामी चित्रपटामुळे चर्चेत करीना!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान सध्या तिच्या आगामी 'क्रू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात करीनासोबत अभिनेत्री तब्बू आणि क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच चित्रपट निर्मात्यांनी 'क्रू' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझर येताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. करीनाचा हा आगामी चित्रपट २९ मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

WhatsApp channel