बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. तसेच आम्हाला एकटे सोडा असे देखील म्हटले आहे. पण तिने पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. करीनाने राग व्यक्त करणारी पोस्ट काही कारणास्तव डिलिटही केली. आता करीनाची पोस्ट नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया...
करीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना कपूरची बिल्डींग दिसत आहे. तसेच बिल्डींगमध्ये काही जण लहान मुलांच्या गाड्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे. खरं तर जेह आणि तैमूरसाठी अभिनेत्रीच्या घरी नवीन खेळणी आल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलं होतं. करीनाच्या नाराजीवरून हे स्पष्ट होते की, ती सध्या घरातील अपघातामुळे अस्वस्थ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून, 'बंद करा आता हे. तुमच्याकडे हृदय नाही ना... कृपया आम्हाला एकटे सोडा...' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
करीनाच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनीही या मुद्द्याचे समर्थन केले आहे. करीनाच्या कुटुंबीयांना प्रायव्हसी द्या आणि अशा बातम्या थांबवा, असे आवाहन चाहत्यांनी केले आहे. करीनाने बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. सैफ अली खानचे चाहते आणि करीनाचे फॉलोअर्स या कठीण काळात तिच्या पाठीशी उभे आहेत.
वाचा: रिया चक्रवर्तीने वाचवले एका महिलेचा जीव, तुरूंगातून बाहेर येताच तिने मानले आभार
अभिनेता सैफ अली खानयाच्या वांद्रे येथील राहत्या घरी १६ जानेवारी रोजी चाकूने वार करण्यात आले होते. या घटनेनंतर करीना आपल्या कुटुंबासह रुग्णालयात असून सैफची काळजी घेत आहे. काल संध्याकाळी अभिनेत्री आपली दोन मुले तैमूर आणि जेह यांना वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात घेऊन आली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, परंतु त्याला अद्याप डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या