Gashmeer Mahajani News: कलर्स वाहिनीवरील रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी १४' हा शो चर्चेचा विषय बनला आहे. शोचा ग्रँड फिनाले सुरू झाला असून शोचा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. या सीझनमध्ये कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, असीम रियाझ, अभिषेक कुमार, आशिष मेहरोत्रा, शिल्पा शिंदे, नियती फतनानी, गश्मीर महाजनी, करणवीर मेहरा, निम्रीत कौर अहलुवालिया, अदिती शर्मा आणि सुमोना चक्रवर्ती हे स्पर्धक होते.
या सीझनमध्ये बरेच वाद झाले आणि असीम रियाझला पहिल्याच एपिसोडमध्ये शो सोडण्यास सांगण्यात आले. त्यानंतरही स्पर्धकांमध्ये अनेक तक्रारी आणि वादविवाद झाले. स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांसाठीसुद्धा हा एक मसालेदार सीझन ठरला.
१४ वा सीझन आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १४ व्या सीझनचा विजेता मिळण्याची वेळ जवळ आली आहे. शोमध्ये पाच फायनलिस्ट होते, ज्यात करणवीर, अभिषेक, गश्मीर, शालीन आणि कृष्णा यांचा समावेश होता. 'खतरों के खिलाडी १४' च्या ग्रँड फिनालेच्या आजच्या एपिसोडमध्ये, टॉप तीनसाठी लढत होती. यामध्ये पहिला होता करणवीर आणि गश्मीरचा हेलिकॉप्टर स्टंट. करणवीरने स्टंट जिंकून आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. नंतर शालीन, कृष्णा आणि अभिषेक यांनी वॉटर स्टंट केले आणि शालीनने ते जिंकले.
कृष्णा आणि अभिषेकने मध्येच स्टंट थांबवल्याने. चाहते निराश झाले आहेत. यानंतर शालिन आणि करणवीरने इलेक्ट्रिक शॉक स्टंट केले आणि करणवीर विजेता ठरला. तो 'आता खतरों के खिलाडी १४' च्या टॉप थ्रीमध्ये पोहोचला आहे. त्याच्या प्रवासाने चाहते प्रभावित झाले आहेत आणि तो विजेता व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. सोबतच मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीच्या कामगिरीनेसुद्धा चाहते खुश आहेत. त्यानेच शो जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक चाहत्यांना तो विजेता बनलेला पाहायचा आहे.विजेत्याला ट्रॉफीसोबत एक लग्जरी कार आणि २० लाख रुपये रक्कम मिळणार आहे.
फिनाले वीकच्या पहिल्या एपिसोडच्या शेवटी, करणवीर मेहरा हा टॉप ३ मध्ये प्रवेश करणारा पहिला स्पर्धक बनला. आता गश्मीर महाजनी, शालीन भानोत, कृष्णा श्रॉफ आणि अभिषेक कुमार हे टॉप ३ मध्ये दोन रिकाम्या जागा घेण्याच्या शर्यतीत आहेत. फिनाले एपिसोडमध्ये, आलिया भट्ट आणि वेदांग रैना त्यांच्या पुढील चित्रपट 'जिगरा' च्या प्रमोशनसाठी शोमध्ये येतील. ते स्पर्धकांसोबत खूप मजामस्ती करताना दिसून येतील. भारती सिंग, कश्मिरा शाह आणि निया शर्मा देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.