वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता, वाचा नेमकं काय झालं होतं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता, वाचा नेमकं काय झालं होतं?

वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता, वाचा नेमकं काय झालं होतं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 10, 2024 03:39 PM IST

Karanveer Mehra: एका अभिनेत्याने नुकताच आयुष्यातील घटना सांगितली आहे. वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

Karanveer Mehra
Karanveer Mehra

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तसेच वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. सध्या बिग बॉसचा १८वा सिझन सुरु झाला आहे. या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक करणवीर मेहराने वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांना गमावले आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताच तो वडिलांच्या आठवणीत भावूक झाला आहे. जेव्हा वडिलांचे निधन झाले तेव्हा त्याला रडूही आले नव्हते हे जेव्हा करणवीरने सांगितले तेव्हा सर्वजण चकीत झाले.

आईसोबत कधीच वडिलांच्या निधावर बोलला नाही

बिग बॉसच्या घरात गप्पा मारत असताना करणवीर मेहराने वडिलांच्या मृत्यूशी आणि आईशी संबंधित भावनिक गोष्टी शेअर केल्या आहेत. शहजादा धामी म्हणाली की, मुलाला आई आणि वडील दोघांच्याही प्रेमाची गरज असते. त्यावर करणवीर उत्तर देत म्हणाला की, 'पण माझ्या आईने मला एक टक्के देखील वडिलांची कमतरता भासू दिली नाही. आता ती हा शो बघत असेल आणि रडत असेल. कारण या गोष्टींबद्दल आम्ही कधी बोललोच नाही. कारण मी एक मुलगा आहे. मुलं कधी रडत नाहीत अशा झोनमध्ये वाढलो आहे. वडिलांच्या मृत्यूवर मी कधीच रडलो नाही.' शहजादाने देखील सांगितले की तो ही वडिलांच्या मृत्यूवर रडला नाही.

वडिलांच्या निधनानंतर रडला नाही

करणवीर पुढे म्हणाला, 'पण खरंतर मी कशासाठी रडलो ते सांगतो. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना झाकून ठेवण्यात आले. दोन दिवसांआधीच ब्लेड लागून चुकून त्यांची मिशी कापली गेली होती. ते पाहून मी खूप हसलो होतो... त्यावर त्यांनी दोन दिवसात पुन्हा मिशी येईल असे सांगितले होते. त्यानंतर लगेच पुढच्या दोन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. सगळे रडत होते आणि आलेल्या सर्वांना पाणी देत होतो. मी रडत नव्हतो म्हणून सर्वांना आश्चर्य वाटत होते. अनेक जण बोलत होते की याला काही फरक पडत नाही. सगळ्यांनी माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली की बेटा, तुला सगळं सांभाळावं लागेल. आता तुला घराची जबाबदारी सांभाळावी लागेल. ते सगळं ऐकून मी चिडले होतो.'
Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू

मी फक्त १० वर्षांचा होतो आणि मला सगळेजण घेऊन जात होते. मला त्यांचा चेहरा दाखवत होते. कुणीतरी म्हटलं, निघताना बाय म्हण, चेहरा बघ. जेव्हा मी त्यांच्या मृतदेहाकडे पाहिले तेव्हा त्यांची मिशी आली नव्हती. ते पाहून मला आणखी रडायला आले. शेवटी मी रडलो असे करणवीर पुढे म्हणाला.

Whats_app_banner