बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणून अभिनेता करण सिंह ग्रोवर आणि अभिनेत्री बिपाशा बासू ओळखले जातात. त्यांच्या लग्नाच्या निर्णयानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. कारण करणचे हे तिसरे लग्न होते. तो बिपाशाला डेट करत असताना विवाहित होता. आज २३ फेब्रुवारी करणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी...
बिपाशा बासूशी लग्न करण्यापूर्वी करण सिंह हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होता. याआधी अभिनेत्री जेनिफर विंगेटला डेट करत तिच्याशी लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतला. पण या दोघांचा संसार फारकाळ टिकला नाही. दोन वर्षांमध्येच जेनिफर-करणचा घटस्फोट झाला. इतकच नव्हे तर जेनिफरने करणवर फसवणूकीचा आरोपही केला होता.
वाचा: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत...; उर्फीचे ट्वीट व्हायरल
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने करणला दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहात पकडले होते. ते पाहून जेनिफरला राग अनावर झाला होता. तिने तेथेच सर्वांसमोर करणच्या कानशिलात लगावली होती. जेनिफर ही करणची दुसरी पत्नी. दिल मिल गए या मालिकेच्या सेटवर तिने कानाखाली मारल्याची बातमी वाऱ्यासारखी परसली होती. त्यापूर्वी करणचे लग्न श्रद्धाशी झाले होते. तेव्हाही करण एक्स गर्लफ्रेंडमुळे श्रद्धाला टाळत असल्याचे समोर आले होते.
पहिल्या पत्नीशी घटस्फोट आणि निकोलशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने जेनिफरला डेट करण्यासा सुरुवात केली होती. जेनिफरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करण-बिपाशा यांच्यामध्ये जवळीक वाढली. सध्या हे दोघं त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये रमले आहेत.