‘बिग बॉस १५’चे स्पर्धक करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र, आता या दोघांच्या ब्रेकअपची अफवा समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, तेजस्वीला करण कुंद्राच्या मैत्रिणींमुळे प्रॉब्लेम होता, ज्यामुळे दोघे वेगळे झाले आहेत. करण आणि तेजस्वी यांच्या नात्याची सुरुवात बिग बॉसच्या घरात झाली होती.
रेडिटवरील एका युजरने करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपच्या अफवांवर भाष्य केले आहे. रेडिट युजरने लिहिले की, ‘प्रॉडक्शनमधील एका मित्राकडून ऐकले आहे की, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या आयुष्यात वादळ आले आहे. कथित ब्रेकअपची अनेक कारणे आहेत.’ या पोस्टमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, तेजस्वी प्रकाशची करण कुंद्राच्या मित्रांसोबत कधीच मैत्री झाली नाही. दोघेही टोकाचे व्यक्तिमत्त्व असून एकमेकांबद्दल अत्यंत पझेसिव्ह आहेत. तेजस्वी प्रकाशला करण कुंद्राच्या मैत्रिणींसोबतच्या जवळीकीचाही त्रास होत होता.
या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘करण कुंद्रा त्यांच्या या नात्यात कंटाळला आहे आणि तो ‘बेवफा’ म्हणून कुप्रसिद्ध आहे. अनावश्यक ट्रोलिंग टाळण्यासाठी करण आणि तेजस्वी ब्रँड डील्स आणि फॅन्समुळे याबद्दल बोलत नाहीत. दुसरीकडे, या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ब्रेकअपच्या बातमीनंतर अर्जुन आणि मलायकाप्रमाणेच करण आणि तेजस्वी एकत्र दिसतील, पण त्यांच्यात सर्व काही ठीक नाही.
या व्हायरल पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंटमध्ये लोक तेजस्वी आणि करणबद्दल आपापली मतं मांडत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, मला ते दोघं आवडत नाहीत, पण दोघांचं ब्रेकअप झालं आहे असं मला वाटत नाही. करण तेजस्वीचा दिवाना आहे आणि तेजस्वी तिचे वैयक्तिक आयुष्य फारसे सार्वजनिकरित्या सगळ्यांना सांगत नाही. तर, एका युजरने करण कुंद्राला ‘सीरियल चीटर’ म्हटले आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या प्रेमप्रकरणाची सुरुवात ‘बिग बॉस १५’च्या घरात झाली होती. घराबाहेर पडल्यानंतर दोघांनीही आपल्या नात्याला दुजोरा दिला. या दोघांचे एकमेकांसोबत फिरतानाचे आणि मस्ती करतानाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर समोर येत असतात. करण कुंद्रा किंवा तेजस्वी प्रकाश यांनी अद्याप या अफवेला दुजोरा दिलेला नाही. व्हायरल झालेल्या पोस्टवर लोक आपला अंदाज बांधत आहेत.
संबंधित बातम्या