IIFA Awards2024 Viral Video: दुबईतील अबुधाबीमध्ये नुकताच ‘आयफा पुरस्कार २०२४’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या मेगा इव्हेंटमधला एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून गेला आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ खूपच भावूक करणारे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ इतर कोणाचा नसून, बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि करण जोहर यांचा आहे. या व्हिडीओमध्ये असे काय आहे की, ज्याची इतकी चर्चा होत आहे? चला जाणून घेऊया...
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि विकी कौशल ‘आयफा अवॉर्ड्स २०२४’च्या मंचावर होस्टिंग करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यादरम्यान विकी आणि शाहरुख करणची खूप वेगळ्या पद्धतीने स्तुती करतात आणि म्हणतात की, काही पालक आपल्या मुलांसाठी वारसा सोडतात. तेव्हा शाहरुख खान म्हणतो की,कधी कधी असे भाग्यवान पालक असतात, ज्यांची मुलं त्यांचा वारसा पुढे चालवतात. त्यापैकीच एक म्हणजे करण जोहर.
किंग खान पुढे म्हणतो की,करण जोहर हा असाच एक आदर्श मुलगा आहे…यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून करण जोहरचे स्वागत केले आणि करण स्टेजवर येताच त्याने आधी विकी कौशलला मिठी मारली आणि नंतर शाहरुख खानला त्याच्या पायाला स्पर्श करून त्याच्या पाया पडला आणि नंतर त्याला मिठी मारली. यानंतर विकीने करणला पुरस्कार दिला. आता आयफा अवॉर्ड २०२४च्या या खास क्षणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहेत. यावर एका युजरने लिहिले की,‘किंग खान खरोखरच बॉलिवूडचा किंग आहे’. ‘करण जोहरने खरच शाहरुख खानच्या पायाला स्पर्श केला का?’,असे आणखी एका युजरने लिहिले. तिसऱ्या एका युजरने लिहिले की,‘करण जोहरची प्रतिक्रिया अप्रतिम होती.’ आणखी एका युजरने लिहिले की,‘हा खूप गोड व्हिडीओ आहे.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स अशाच अनेक कमेंट करत आहेत. आयफा अवॉर्ड्स २०२४मध्ये करण जोहरला सिनेमात २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दलच्या अचिव्हमेंटसाठी पुरस्कार देण्यात आला आहे.