बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा त्याच्या लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखला जातो. त्याने मुंबईतील पाली हिल परिसरात राहण्यासाठी भाडेतत्वावर घर खरेदी केले आहे. त्याने हे घर तीन वर्षांसाठी घेतले आहे. करण जोहरने घेतलेल्या या घराचे भाडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल,
मुंबईतील खार पश्चिमेकडील पाली हिल भागात २१ युनियन पार्क नावाच्या इमारतीमध्ये करण जोहरने ड्युप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही मलमत्ता आहे. पहिल्या १२ महिन्यांसाठी या घराचे भाडे ८ लाख १० हजार रुपये असणार आहे. तर दुसऱ्या वर्षी भाड्यामध्ये वाढ करुन ८ लाख ५० हजार रुपये असणार आहे. तिसऱ्या वर्षी या घराच्या भाड्यामध्ये अधिक वाढ होणार असून ८ लाख ९३ हजार रुपये करण्यात येणार आहे. करणने घरासाठीचा हा करार २३ ऑगस्ट २०२४ रोजी केला आहे.
अभिनेता इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन यांनी चित्रपट निर्माता करण जोहरकडून तीन वर्षांसाठी ९ लाख रुपयांच्या मासिक भाड्याने मुंबईतील वांद्रे भागात फ्लॅट भाड्याने घेतला होता. झॅपकीने शेअर केलेल्या लिव्ह अँड लायसन्स करारानुसार इम्रान खानने करण जोहरकडून वांद्रे येथील कार्टर रोडवरील क्लेफेपेट येथील तीन मजली फ्लॅट भाड्याने घेतला होता. २० मार्च २०२४ रोजी या कराराची नोंदणी करण्यात आली असून या करारावर २७ लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट देण्यात आले आहे.
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
२०२१ मध्ये जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शनने अंधेरी पश्चिम भागात त्याच्या मालकीच्या दोन व्यावसायिक मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केले. या दोन्ही मालमत्ता अनुक्रमे १७.५६ लाख रुपये आणि ६.१५ लाख रुपये दरमहा भाड्याने दिल्या आहेत. या दोन्ही मालमत्तांच्या नोंदणीची कागदपत्रे दिसून आली होती.