मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kshitee Jog: करण जोहरने मागितली क्षिती जोगची माफी! कारण ऐकलंत का?

Kshitee Jog: करण जोहरने मागितली क्षिती जोगची माफी! कारण ऐकलंत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 01, 2024 07:06 PM IST

Karan Johar Apologies to Kshitee Jog: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने क्षिती जोग हिची माफी मागितली होती. या मागे देखील एक खास कारण होतं.

Karan Johar Apologies to Kshitee Jog
Karan Johar Apologies to Kshitee Jog

Karan Johar Apologies to Kshitee Jog: अभिनेत्री ते निर्माती असा धडाकेबाज प्रवास करणारी क्षिती जोग हिचा आज (१ जानेवारी) वाढदिवस आहे. मराठी सोबतच क्षिती जोग हिने हिंदी चित्रपट विश्वातही आपला दबदबा निर्माण केला आहे. क्षिती जोगने तिच्या वाढदिवसानिमित्ताने एका किस्सा शेअर केला आहे. नुकत्याच एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत क्षिती जोग हिने तिच्या वाढदिवसाचा एक किस्सा सांगितला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने क्षिती जोग हिची माफी मागितली होती. या मागे देखील एक खास कारण होतं.

करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात क्षिती जोग हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यामुळे करण जोहरच्या अगदी जवळच्या लोकांमध्ये क्षितीचं नाव सामील आहे. तिच्या वाढदिवशी कारण जोहर तिला फोन करून शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी मात्र करण जोहर क्षिती जोग हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला होता. तीन दिवसांनी त्याने मेसेज करून क्षितीला शुभेच्छा देऊन, बर्थडे विसरल्याबद्दल त्याने तिची माफी देखील मागितली होती. याचा किस्सा शेअर करताना क्षिती जोगला देखील हसू आलं.

Third Eye Asian Film Festival: मराठी चित्रपटांचा डंका! ‘या’ दिवशीपासून होणार ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’

करण जोहरसारखा अतिशय व्यस्त असलेला व्यक्ती क्षितीचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला आठवणीने शुभेच्छा देतो, यावरूनच लक्षात येते की, हिंदी चित्रपट सृष्टीत देखील क्षितीचा किती दबदबा आहे. आपल्या वाढदिवसाच्या आठवणी सांगताना क्षिती जोग म्हणाली की, ‘माझा वाढदिवस १ जानेवारीला येतो. त्यामुळे अनेक लोक हा दिवस विसरून जातात. ३१ डिसेंबरला रात्रभर जागून, पार्टी करून थकलेले असतात. त्यामुळे देखील काही लोक वाढदिवस विसरून जातात. आणि एक-दोन दिवसानंतर मला शुभेच्छांचे फोन-मेसेज यायला लागतात. त्यामुळे मला या गोष्टींची सवय आहे.’

अभिनेत्री क्षिती जोग हिचा ‘झिम्मा २’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील कल्ला केला होता. याशिवाय ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील क्षिती जोग हिची भूमिका गाजली होती. महिला सक्षमीकरण दाखवणाऱ्या भूमिका साकारण्यात क्षिती जोग हिचा हातखंडा आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील तिच्या भूमिका अशाच काहीशा होत्या. तर, विनोदी भूमिका देखील ती उत्कृष्टपणे साकारते.

WhatsApp channel

विभाग