Valentine's Special Love Storiyaan: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला की, व्हॅलेंटाइन वीक सुरू होते. प्रेमाचा महिना मानला जाणाऱ्या या काळात अनेक वेगवेगळे चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कथा विशेषतः प्रेमकथा असतात. आता करण जोहर देखील चाहत्यांना असच एक खास सरप्राईज देणार आहे. यंदाच्या व्हॅलेंटाइन आठवड्यात करण जोहर एक-दोन नव्हे तर, ६ प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या कथा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहेत.
करण जोहर 'व्हॅलेंटाइन वीक'मध्ये चाहत्यांसाठी नवीन सीरिज घेऊन आला आहे. 'लव्ह स्टोरीयां' नावाच्या या सीरिजमध्ये ६ धमाकेदार प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. या सीरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या प्रेमकथा खऱ्या असणार आहेत. करण जोहरने नुकतीच इंस्टाग्रामवर या नव्या सीरिजची घोषणा केली. करण जोहरची ही नवी सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या या नवीन सीरिजमधील सहा कथांचे दिग्दर्शन सहा वेगवेगळे दिग्दर्शक करणार आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी हे या कथांचे दिग्दर्शक असणार आहेत. या सीरिजच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी उचलली आहे. या 'लव्ह स्टोरी' खऱ्या आयुष्याशी संबंधित असणार आहेत.
‘लव्ह स्टोरींया’ या सीरिजबद्दल सांगताना करण जोहरने लिहिले की, 'खऱ्या प्रेमाच्या खऱ्या कथा... देशभरातून... लवकरच या व्हॅलेंटाइनला तुमच्या भेटीला येत आहे. १४ फेब्रुवारीपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर लव्ह स्टोरींया...’ आपल्या या नव्या सीरिजबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला की, आमच्यासाठी या प्रेमकथा केवळ सीरिज नसून, त्या प्रेक्षकांना आणि आम्हाला अनुभवायच्या आहेत. या लव्ह स्टोरी सीरिजमधून प्रत्येक प्रकारचे कनेक्शन पडद्यावर दाखवले जाणार आहे. यापूर्वी करण जोहर याने 'कॉफी विथ करण सीझन ८'चे होस्टिंग केले होते. कार्यक्रमाच्या या सीझनमध्ये देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झालेले दिसले होते.
करण जोहरचा नुकताच प्रदर्शित झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हा चित्रपट करणसाठी देखील खास होता. या चित्रपटात आलिया भट्टसोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला होता.